Beed Loksabha : मतदारांनी महायुतीचा माज जिरवला : बजरंग बप्पांचा ऐतीहासिक विजय

 Beed Loksabha : मतदारांनी महायुतीचा माज जिरवला : बजरंग बप्पांचा ऐतीहासिक विजय



आठराव्या लोकसभेसाठी बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत अतितटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा त्यांनी ६५५३ मतांनी पराभव केला. २००९ पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला यश आले आहे. बजरंग सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ इतकी मते मिळाली. बजरंग सोनवणे यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे.



बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यापासूनच चुरसीची होती. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार बदलत प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली
होती तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सोनवणे बांनी मागची निवडणुक प्रितम मुंडे यांच्या विरोधात लदविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता, पाच वर्षानंतर सोनवणे यांनी त्या पराभवाचा वचपा काढला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच मतदानाच्या टक्क्याने ५० ओलांडली होती. विक्रमी १५ लाख १७ हजार इतके मतदान बीड जिल्ह्यात झाले होते. त्यामुळे मताचा बाढलेला टका कोणाच्या फायद्याचा बाबाबत बर्चा सुरू होत्या, त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीमध्ये चुरस असल्याचे जानवत होते. आघाडीचा लोलक कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे यांच्या बाजुने झुकत होता. अखेर रात्री उशिरा ३२ फेऱ्यांची मतमोजणी संपल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर ६५५३ मतांची आघाडी घेतली.



पंकजांकडून फेरमतमोजणीची मागणी

ईव्हीएम वरील मतमोजणी जवळपास संपल्यानंतर पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रावर आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागली.

मोदींची सभा अंगलट आली

■ बीड जिल्ह्यात ज्या क्षणी नरेंद्र मोदींची सभा निश्चित झाली त्याच वेळी त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसणार हे निश्चित मानले जात होते आणि अगदी तसेच झाले. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात मुस्लिम समाजावरही घणाघात केला व तसेच ओबीसीमध्ये कोणालाही येवू देणार नाही असे म्हणत ओबीसीमधून आरक्षण मागणार्या मराठा समाजाला देखील मोदींनी अंगावर घेतले याचा थेट परिणाम पंकजा मुंडेंच्या मतांवर झाला हे सत्य नाकारून चालणार नाही. मोदींच्या सभेनंतर मराठा आणि मुस्लीम समाज प्रचंड रोषाने पेटून उठल्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहिला मिळाले. जर मोदींची सभा झाली नसती तर निश्चित पंकजा मुंडेंना मुस्लीम आणि मराठा सम ाजाचे थोडेफार अधिक मतदान पडले असते.






✌️ *जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील खासदार कोण? पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी*


▪️ अहमदनगर : निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार)


▪️ अकोला : अनुप धोत्रे (भाजप) 


▪️ अमरावती : बळवंत वानखेडे (काँग्रेस)


▪️ संभाजीनगर : संदीपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट)


▪️ बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार)


▪️ *बीड : बजरंग सोनवने /राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार


▪️ भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)


▪️ भिवंडी : बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)


▪️ बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिवसेना - शिंदे गट)


▪️ चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)


▪️ धुळे : सुभाष भामरे (भाजप)


▪️ दिंडोरी : भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)


▪️ गडचिरोली : डॉ. नामदेव दासाराम किरसान (काँग्रेस)


▪️ हातकलंगणे : धैर्यशील माने (शिवसेना - शिंदे गट)


▪️ हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ जळगाव : स्मिता वाघ (भाजप)


▪️ जालना : कल्याणराव काळे (काँग्रेस)


▪️ कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना - शिंदे गट)


▪️ कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस)


▪️ लातूर : शिवाजीराव काळगे (काँग्रेस)


▪️ माढा : धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)


▪️ मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना - शिंदे गट)


▪️ मुंबई नॉर्थ : पियुष गोयल (भाजप)


▪️ मुंबई नॉर्थ सेंट्रल : वर्षा गायकवाड (काँग्रेस)


▪️ मुंबई नॉर्थ ईस्ट : संजय दिना पाटील (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ मुंबई नॉर्थ वेस्ट : रविंद्र वायकर (शिवसेना - शिंदे गट)


▪️ मुंबई साऊथ : अरविंद सावंत (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ मुंबई साऊथ सेंट्रल : अनिल देसाई (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ नागपूर : नितीन गडकरी (भाजप)


▪️ नांदेड : वसंतराव चव्हाण (काँग्रेस)


▪️ नंदुरबार गोवाल पाडवी (काँँग्रेस)


▪️ नाशिक : राजाभाऊ वाजे (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ धाराशिव : ओमप्रकाश निंबाळकर (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ पालघर : हेमंत सावरा (भाजप)


▪️ परभणी : संजय जाधव (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजप)


▪️ रायगड : सुनिल तटकरे (राष्ट्रवादी - अजित पवार गट)


▪️ रामटेक : श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)


▪️ रत्नागिरी सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजप)


▪️ रावेर : रक्षा खडसे (भाजप)


▪️ सांगली : विशाल पाटील (अपक्ष)


▪️ सातारा : छ. उदयनराजे भोसले (भाजप)


▪️ शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ शिरुर : अमोल कोल्हे (शिवसेना - ठाकरे गट)


▪️ सोलापूर : प्रणिती शिंदे (काँग्रेस)


▪️ ठाणे : नरेश म्हस्के (शिवसेना - शिंदे गट)


▪️ वर्धा : अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)


▪️ यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख (शिवसेना - ठाकरे गट)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.