BEED | काका जयदत्त क्षीरसागर हे निवडणुकीच्या आधीच सक्रिय होतात; आणि पडल्यानंतर चांगले काम करतात- Sandip Kshirsagar

 BEED | काका जयदत्त क्षीरसागर हे निवडणुकीच्या आधीच सक्रिय होतात; आणि पडल्यानंतर चांगले काम करतात- Sandip Kshirsagar 





बीड तेजवार्ता प्रतिनिधी -  बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये विविध प्रश्न संदर्भात पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदे दरम्यान काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आमदार संदीप क्षीरसागरांनी निशाणा साधला आहे. निवडणुका जाहीर झाल्यावरच ते ऍक्टिव्ह होतात आणि ते निवडणूक आल्यानंतरच ते प्रगट होतात. अशा शब्दात आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. आमचे काका निवडणुका आल्या की सक्रिय होतात. आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत, परंतु मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून हे जबाबदारीने सांगू शकतो की या निव्वळ अफवा आहेत, असा कुठलाही प्रकार नसल्याचं म्हटलं आहे. काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की सक्रिय होतात परंतु पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने काम करतात असा टोला देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. बीडमध्ये केवळ श्रेयवादाचे राजकारण सुरू असून प्रत्यक्षात काम मात्र होत नाही. हे दुर्दैव आम्ही ज्या कामाचा पाठपुरावा करतो त्याला अडवण्याचे आणि भेदभावाचे राजकारण केले जात आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितलेली आहे, असे देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.