BEED | आष्टी तालुक्यातील खिळद गावात मुंडन करून सरकार विरोधात ओबीसी समाजाचा रोष
विडीओ पहा👆📽️
आष्टी- बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद गावात ओबीसी बांधवांनी मुंडन करून राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता समस्त ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरला होता. आणि याच वेळी काही समाज बांधवांनी मुंडन करून हा रोष व्यक्त केला आहे. मागील तीन दिवसांपासून खिळद गावात शहादेव गर्जे आणि अंकुश महाजन या दोघांच्या माध्यमातून बेमुदत उपोषण सुरू आहे. आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील ओबीसी समाज बांधवांनी हजेरी लावली होती. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत हे मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.
stay connected