निलेश लंके म्हणतात कमीत कमी दोन लाख

निलेश लंके म्हणतात कमीत कमी दोन लाख



लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निलेश लंके यांनी सांगीतले की ,मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत तर वाढतच आहेत. ‘

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना कमीत कमी दोन लाख मतांच्या फरकाने आपण विजयी होऊ असा दावा केलेला आहे.  निलेश लंके हे सुरुवातीपासूनच ‘ कमीत कमी दोन लाख ‘ ही टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवत असून त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झालेली  असली तरीही सुजय विखे यांच्या यंत्रणेला घाम त्यांनी चांगलाच घाम फोडलेला होता. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.