कडा येथे माऊली बालसंस्कार केंद्र / प्री प्रायमरी स्कूल चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
आज दि. 1 जून 2024 रोजी डी बी . करडुळे सेवाभावी संस्था संचलित माऊली बालसंस्कार केंद्र / प्री प्रायमरी स्कूल चा उद्घाटन सोहळा मनोरंजन धस साहेब व संगीताचार्य गणेश महाराज भगत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सुरेश पवार सर ( मा. अध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था ), मारुती पठाडे सर ( अध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था ), अशोक लटपटे सर ( उपाध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था ), ह. भ. प.दत्तोबा करडुळे, गंगाधर आबा आजबे,चव्हाण साहेब, केशव धनगरे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली बालसंस्कार केंद्राच्या संचालिका कोमल नितीन करडूळे यांनी केले, यामध्ये त्यांनी माऊली बालसंस्कार केंद्राचे उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. सुरेश पवार सर, पठाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून माऊली बालसंस्कार केंद्र शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश महाराज भगत यांनी सामाजिक स्थिती, शिक्षण,मराठवाडा या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले व माऊली बालसंस्कार केंद्रास शुभेच्छा दिल्या.मनोरंजन धस साहेबांनी आजचे शिक्षण व्यवस्थेत काय बदल हवेत, तालुक्याचे शिक्षण व्यवस्था आणि दिशा याविषयी सविस्तर विवेचन केले. माऊली बालसंस्कार केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन श्री अशोक उढाणे सर व आभार प्रदर्शन श्री योगेश जगताप व संतोष शेळके सरांनी केले.
stay connected