शालेय जीवनापासून समाजकारण व राजकारणाची आवड असणारे युवा नेतृत्व ॲड.रिजवान शेख...
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी शहरातील युवा नेतृत्व ॲड रिजवान शेख यांचे शिक्षण बीएससी एलएलबी पर्यंत झाले असून त्यांना कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या हिमतीवर व शालेय जीवनापासून असणारे समाजकारण व राजकारणाची आवड याच पाठबळावर आष्टी शहर व तालुक्यामध्ये तरुणांमध्ये व विविध समाजामध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटून घरची परिस्थिती साधारण असतानाही कुठेही ना डगमगता आपलं नाव लौकिक केले. गेल्या पंधरा वर्ष माजी मंत्री तथा विधान परिषदचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्यावर निष्ठा ठेवून सामाजिक व राजकीय दळण-घडण अत्यंत प्रामाणिकपणे करणारा हा तरुण आज संपूर्ण तालुक्यामध्ये आपला नाव लौकिक केलं असं दिसत आहे मागील काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला व येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे ध्येय धोरण संपूर्ण तालुक्यामध्ये युवक असतील विद्यार्थी असतील व सर्व समाजातील घटकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे...
शून्यातून विश्व निर्माण करणारा युवा उद्योजक रिजवान शेख...
घरची परिस्थिती साधारण असताना कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नसताना सो कर्तुत्वावर कोणाचेही पाठबळ नसताना जनसेवा प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स या नावाचा दालन (ऑफिस) सुरू करून जमिनीचे अकृषी काम करणे तसेच ये णे करने जमिनीविषयी कुठल्याही अडचण असल्यास स्वतः लक्ष देऊन ती पूर्ण करण्याचे काम ती करत आहे आष्टी व कडा शहरांमध्ये सर्वसामान्य माणसांना आपलं स्वतःचा प्लॉट अथवा घर असावा यासाठी योग्य किमतीमध्ये प्लॉट उपलब्ध करून देत आहे आणि आपलं नाव या माध्यमातून आष्टी शहर व संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी केले आहे अशा या तरुणाचं आज वाढदिवस असून मी त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
युवकाच्या सुखदुःखात सामील होणारा...
आष्टी तालुक्यात युवकांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात जोडला असून मित्राच्या वाढदिवस असो किंवा लग्न असो अशा कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणारा व कोणत्या ही मित्राच्या व नातेवाईकांच्या सुखदुःखात कायम धावून जाणारा म्हणून ॲड रिजवान शेख यांच्याकडे पाहिले जात आहे.
stay connected