*जनसामान्यांचं लाडकं नेतृत्व, मार्गदर्शक गुरुवर्य डॉ मा श्री जितीनदादा वंजारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !*
आदरणीय जितीनदादा,
आपण म्हणजे उदारतेची विशाल मूर्ती. आपण म्हणजे हास्याची गोड लहेर.
आपण म्हणजे सहनशक्तिची अमर्याद रेषा. आपण म्हणजे नितीमत्तेचा सागर.
आपण म्हणजे माणुसकीचा निरंतर वाहणारा झरा.
प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता.
नात्यांच्या अतूट बंधनांनी गुंतलेली कविता.
जाणिवांच्या पलीकडचं जगावेगळ गाव. यालाच तर आहे,
जितीनदादा हे नाव.
बालपणी आपल्याला गरिबीचे चटके सोसावे लागले. आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे व समाजाची निस्वार्थ सेवा करणे ही शिकवण आपल्याला आपले वडील यांच्याकडून लहानपणापासूनच मिळाली. आपल्या वडील बंधूंनी केलेला संघर्ष, केलेले कष्ट व केलेली जनसामान्यांची सेवा आपण जवळून अनुभवलीत व त्यातूनच आपली जडणघडण होत गेली. वडील बंधूंच्या सुसंस्कारात आपण वाढलात. त्यामुळेच आपल्या वडील बंधूंप्रमाणे आपणही आजवर समाजसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे आणि सर्व सामान्यांचे लाडके जितीनदादा दादा म्हणून प्रसिद्ध झाला आहात.
.
शिक्षण सुरु असतांना आपण गरिबी जवळून अनुभवलीत. शिक्षण घेत असतांना महिना , महिना आपण शेतात नांगरणी केलीत. लावणी, कापणी, मळणी ही शेतीची सर्व कामे केलीत.
जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर आपण आपली आर्थिक प्रगती करत गेलात व एक प्रसिद्ध डॉक्टर मालक व्यावसायिक बनलात. व्यवसायातील प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा गुण आपल्या अंगी आहे. बदलत्या काळानुसार आपण आपल्या व्यवसायातील प्रगतीचा आलेख उंचावत नेलात.
उद्योगाचे दूत तुम्ही, प्रगतीचे पूत तुम्ही.
परिसराच्या विकासाचे, खरेखुरे अवधूत तुम्ही.
जितीनदादा ,
आपण म्हणजे आयुष्यातला प्रत्येक क्षण आव्हान म्हणून जगणारी एक व्यक्ती. आपल्यासाठी आयुष्य म्हणजे केवळ आनंद आणि मजा असं कधीच नव्हतं. आपल्यासाठी आयुष्य म्हणजे येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्विकारणं आणि जिद्दीने त्याला सामोरे जाणं. आयुष्य म्हणजे संघर्ष हे आम्ही शिकलो आपल्याकडूनच.
आर्थिक प्रगती झाल्यानंतरही आपण आपले जुने दिवस विसरला नाहीत. म्हणूनच प्रत्येक गरीब व्यक्ती विषयी आपल्या मनात विलक्षण आपुलकी आहे. आपण म्हणजे माणसातील माणुसकीची नाती जपणारं , बहुआयामी व्यक्तिमत्व. एक प्रेमळ व मनमिळाऊ व्यक्तिमत्व. अध्यात्मिक विचार, धार्मिक आचरण, सत्कृत्यावर श्रद्धा व समाजसेवी स्वभाव. अशा विविध पैलूंनी समृद्ध व्यक्तिमत्व. दिलदार मनाचा दमदार माणूस, लोकांच्या काळजावर प्रेमाचं अधिराज्य गाजवणारा प्रेमळ माणूस म्हणजे जितीनदादा असा आपला सर्वत्र नावलौकिक आहे. म्हणूनच म्हणावसं वाटतं ,
"जनसेवेचे पाईक तुम्ही, परोपकारी आचार.
अनाथांचा आधार तुम्ही, सदा इतरांचाच विचार.
मायेच्या स्पर्शात तुमच्या ईश्वराचा साक्षात्कार"
समाजात वावरत असतांना त्या समाजाचे ऋण आपल्यावर असतात. याची जाणीव सतत आपल्या मनात असते. आपण समाजाचे खूप काही देणे लागतो आणि समाजाची प्रगती करायची असेल तर हाती सत्ता असावी. हा प्रामाणिक आणि उदात्त हेतू मनात ठेवूनच
नम्रतेने, आपुलकीने प्रत्येकाला जिंकावं,
माणसं कशी जोडावी हे आपल्याकडूनच शिकावं.
दादा,
कुशल नेतृत्वाला आपल्या आदर्शांचा संस्कार आहे.
आपल्या उत्तुंग कार्याला दातृत्वाचाही आकार आहे.
आपल्या हृदयातील या चांगुलपणाच्या जलसाठ्यात आणखी थेंबांची भर पडावी आणि ते सुगंधी विचारांचे दव बिंदू चोहीकडे अलवारपणे शिंपडले जावे. हीच या शुभ दिनी सदिच्छा !
दादा,
5 जून आपला वाढदिवस.
आपल्यासारख्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ वयाचा वाढदिवस नसतो तर आपण आजवर जगलेल्या आदर्श जीवनाचा वाढदिवस असतो.
आपल्या वाढदिवसाला फुलून येतात फुलं, त्यांच्या सुगंधानं काळीज मोहरतं. आपल्या वाढदिवसाला गोड चांदणं पडतं, अंगणभर पसरून आभाळभर उरतं. आपल्या वाढदिवसाला शुभेच्छांची बरसात. असचं न्हाहत रहा आपुलकीच्या पावसात.
कष्टाचे व्हावे चांदणे, यशाचा चंद्रमा दिसावा.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा.
परमेश्वर आपणास सुखी, समृद्ध, निरोगी, उदंड आयुष्य देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
*शुभेच्छुक*
*कु सुनिल ढेबे पोलादपूर*
*स्व जमीन हक्क परिषद भारत*
*अध्यक्ष*
*महाराष्ट्र पत्रकार विग**
*
stay connected