ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटेची अटक बेकायदेशीर
माजलगाव अतिरिक्त न्यायालयाचे आदेश.
माजलगाव : प्रतिनिधी
ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांना पुणे येथून पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे आदेश दिल्याने त्यांना शनिवार दि.15 जून रोज आरोपीस जामीन मंजूर केला होता.परंतु अटक केली होती.हे कारण देत न्यायालयाने शनिवारी दुपारी दोन वाजता कुटे यास सोडून देण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बीड आर्थिक गुन्हे शाखेने नियमानुसार अटक करून बीड पोलिसांच्या स्वाधीन केले.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांनी ठेवीदारांच्या ठेवी न दिल्यामुळे त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते फरार असल्यामुळे पोलिसांना ते सापडत नव्हते. ७ जुन रोजीबीड पोलिसांनी कुटे यास हिंजवडी पुणे इथून अटक केली होती.व त्यास माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता १३ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. १३ तारखेला त्यास पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्याची न्यायालयाने आदेश दिले होते.
या प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर करून ही अटक बेकायदेशीर असल्याचे व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भास्कर धर्माधिकारी शनिवारी दुपारी दोन वाजता पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे मान्य करत त्यांना मुक्त केले मुक्त केले. मुक्त केल्यानंतर ते कोर्टाच्या बाहेर आले व खाजगी वाहनात बसून जात असतांना त्यांना पोलिसांनी अडून अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु अटक करण्यात त्याच्या वकिलाने मजाव करत ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी कुटे यास अटक करून घेऊन जाण्यासाठी आलेल्या जालना येथील आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना न्यायालयात पाचरण करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना कुटे यांना न्यायालय परिसरात अटक करता येणार नसल्याची सत्त ताकीद दिली. यावेळी कुटे याच्या वकिलानी अटकपूर्व जामीन मांडली . यावर सव्वा सहा वाजता न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला. यावर पुढील सुनवाई २० जुन रोजी ठेवण्यात आली.
यावेली आरोपी कुटे हा न्यायालय परिसरात त्यांना अटक न करता न्यायालयात बाहेर बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बोल्डे यांनी सुरेश कुटे व आशिष पाटोदकर यास, बीड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा र.न.११३/२४ मध्ये कायदेशीर नोटीस देऊन अटक केली.व यावेळी या दोघांना बीड येथे घेऊन जाण्यात आले. यावेळी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी डॉ. बी. धिरजकुमार , अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर ,
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.बालक कोळी ,जालना आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश सुरवसे यांच्यासह न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता व यावेळी न्यायालय परिसरात ठेवीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
stay connected