पाणंद रस्त्याच्या नावाखाली आष्टी तालुक्यात बोगस बिले उचलण्याचा प्रकार सखोल चौकशीची दरेकर यांची मागणी
आष्टी (प्रतिनिधी)
शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल बाजारात पोचविणे यासह निकडीच्या बाबी सुकर होण्यासाठी आणि बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
याच माध्यमातून आष्टी तालुक्यात जवळपास 620 हून अधिक पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली.मात्र बोटावर मोजण्या इतकेच पाणंद रस्त्यांचे पूर्ण झालेले काम सोडता एक टोपले देखील न टाकताच स्थानिक प्रशासना सोबत आर्थिक तडजोड करून तालुक्यात न झालेल्या कामांचे बील अदा करण्याचा सपाटा स्थानिक प्रशासनाने लावल्याचे विदारक चित्र आष्टी तालुक्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केली आहे.
सध्या महायुतीचे सरकार असल्याने कोट्यवधीचा आलेला पाणंद रस्त्यांसाठीचा निधी प्रशासनाला हाताशी धरून कार्यकर्त्यांचे खिसे भरण्यासाठी कागदावर काम सुरू असल्याचे दाखवत वितरित करण्याचा सपाटा स्थानिक प्रशासनाने लावला असल्याचे विदारक चित्र आहे.प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजता येतील इतकीच कामे पूर्ण असून मोठ्या प्रमाणावर जिथे शून्य काम झालेले आहे अशा कामावरचा निधी प्रशासकिय अधिकारी यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांनी खिशात घातल्याने प्रशासन देखील या घोटाळ्यात आपले खिसे भरून घेत आहे की काय? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्रशासनातील जे अधिकारी यात दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मनसेचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केली आहे.
मुळात ज्या गावात पाणंद रस्त्यांची कामे करायची आहेत त्या गावातील सरपंच,ग्राम रोजगार सेवक यांची सहमती असणे किंवा त्यांना त्या कामाची माहिती देणे गरजेचे असते मात्र असे न करता तालुक्यात बहुतांशी ठिकाणी कागदोपत्री कामे पूर्ण दाखवत राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिले मंजूर करून घेतल्याने शासनाचा चांगल्या कामाला आलेला निधी कार्यकर्त्यांनी आपल्या खिशात भरण्याचे काम जोरात केले असल्याची चर्चा आष्टी तालुक्यात आहे.त्यातच ज्या ठिकाणी काही प्रमाणात कामे झाली आहेत त्याठिकाणी शेतकऱ्यांची संमती पत्र दानपत्र दिलेली नसताना शासनाच्या नियमानुसार सर्व रस्त्यांची कामे केलेली नाहीत तसेच कामाच्या वेळी जिओ टॅगिंग केलेले आढळून येत नाही किंवा व्हिडिओ शूटिंग केलेली नाही तालुक्यात कुठल्याच कामावर मजुराचा वापर करण्यात आलेला नाही शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत काम करण्याचा बोगस बिलो उचलण्याचा सपाटात चालू आहे तालुक्यातील सर्व कामांची विभागीय चौकशी होणार खूप गरजेचे आहे नाहीतर शासनाच्या महत्त्वकांशी योजनेचा बट्ट्याबोळ करून खूप मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे काही ठिकाणच्या आनंद रस्त्याच्या कामामध्ये किती मीटर रस्ता आहे किती मीटर केला गेला हे सुद्धा चौकशी गरजेचा आहे ज्या ठिकाणी रस्ते झाले त्या ठिकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्या न करता फक्त मुरमाचा थर देऊन रस्ते दाखवून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने कामे होत आहेत आष्टी तालुक्यातील सर्व रस्त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.
stay connected