शिक्षिका,लेखिका,कवयित्री,सुत्र संचालिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानित

 शिक्षिका,लेखिका,कवयित्री,सुत्र संचालिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानित

 


    सिनेआर्क प्रोडक्शनस् आणि रुद्रान्श फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर व सी.ई.ओ.श्री.विनोद खैरे,नागपूर- मुंबई यांच्या विद्यमानाने शनिवार दिनांक १५.०६.२०२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,मंगळवार पेठ,पुणे येथे आपल्या संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा अशा निस्वार्थ,अभूतपूर्व काम करणाऱ्या सौ.प्रतिमा अरुण काळे यांना त्याच्या साहित्य,पर्यावरण व शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट 

कार्यासाठी,मुख्य अतिथि मा.श्री. ज्ञानेश्वर मोहोळ साहेब,माजी. अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर पालिका,पुणे.तसेच श्री.युनूस पठाण साहेब,विद्यमान उपआयुक्त पुणे महानगर पालिका,पुणे,अॅड. सौ. शैलजाताई ज्ञानेश्वर मोहोळ वक्ता, लेखिका, संपादिका पुणे शहर या सोबत विशेष अतिथी,मा.असलम बागवान,अध्यक्ष-इंक्रेडीबल सोशल वर्कर्स ग्रुप,मा.श्री.हाफिज शेख अध्यक्ष निसार फाऊंडेशन,पुणेच्या शुभ हस्ते या मानाच्या " महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ ने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्राने गौरवण्यात आले.

     या प्रसंगी १०१ मान्यवर सत्कार मूर्तींचा "महाराष्ट्र रत्न पुरस्काराने" यथोचित सम्मान करण्यात आला.

     या वेळी,सिनेआर्क प्रोडक्शनस् आणि कास्टिंग स्टुडिओ चे मॅनेजिंग डायरेक्टर व सी.ई.ओ.श्री.विनोद खैरे, यांनी असे सांगितले कि "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराचा उद्देश फक्त एवढाच कि विविध कार्यक्षेत्रातील निस्वार्थ लोकांनी एकत्र सिनेआर्क प्रोडक्शनस् कृत "महाराष्ट्र रत्न" च्या छत्रा खाली

यावे,एकमेकास मदत करावी,मिळून सर्व कोण्या एखाद्या व्यक्तीस, समाजास,गरजवंतांना सर्वोतोपरी शक्य असेल ती सर्व मदत करावी, शक्य तितक्या लोकांना योग्य रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण,शालेय व उच्चशिक्षण,समाजात ओळख व त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी जे जे शक्य असेल ते ते सर्व आपण एकत्रितपणे करण्यासाठीच हा उपक्रम राबविला जातोय.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.