आष्टी येथील हंबर्डे कॉलेजमधे कॉम्प्यूटर टायपिंग परिक्षेत डमी विद्यार्थ्यांचा सुळसुळाट
केंद्रसंचालक फक्त नावालाच . सर्व कारभार आयटी टीचरच्या हाती .
बुलढाणा येथील टायपिंग परिक्षा केंद्रावरील कारवाई पूर्ण होते ना होते तोच आष्टी येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे .
दि 10 जुनपासून कॉम्प्यूटर टायपिंग परिक्षा सुरू झालेल्या आहेत . परंतु नेहमीप्रमाणेच डमी विद्यार्थ्यांचे सत्र चालूच आहे . प्रत्येक परिक्षेच्या वेळी राज्यातील कुठल्या ना कुठल्या परिक्षा केंद्रावरील काळाबाजार उघडकीस येत आहे . परंतु तरीही शासन याला आळा घालण्यास अक्षम ठरत आहे .
आष्टी येथील हंबर्डे कॉलेजमधे इंग्रजी विषयाचे टायपिंगचे पेपर झाले . त्यामधे मोठ्या प्रमाणात डमी विद्यार्थी बसवून शासनाची फसवणूक करण्यात आली . त्याठिकाणी जामखेड , कर्जत व आष्टी अशा तीन तालूक्याचे पेपर आहेत . त्यामुळे विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात आहे . त्याचाच गैरफायदा येथील आयटी टीचर आगलावे यांनी घेतला. ओरिजीनल विद्यार्थी बाजूला बसवून त्याजागी डमी विद्यार्थी बसवले जातात व ओरिजीनल विद्यार्थ्यांच्या समक्ष पेपर सोडवला जातो .
आयटी टीचरला मदत म्हणून सहा ते सात मूलं आतमधे सोडली जातात व हिच मुले पेपर सोडवण्यासाठी वापरली जातात . हा सर्व प्रकार केंद्रसंचालकांच्या समोर केला जातो हे विशेष.
हा सर्व प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व्हिडीओ फुटेजची मागणी केली असता 'व्हिडीओ फुटेज परिक्षा परिषदेमधे जाऊन घ्या आणि काय करायच ते करा ' अशी अरेरावीचे उत्तर आयटी टीचरकडून देण्यात येतात .
डमी विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट व आधार कार्ड तपासले असता असे आढळून आले की बरेचसे विद्यार्थी जिल्ह्याबाहेरील असून त्यांनी हरिओम कॉम्प्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे अनाधिकृतपणे प्रवेश घेतलेला आहे .
या सर्व गोष्टी पालकांच्या लक्षात येतात मग शासनाच्या लक्षात का येत नाहीत . शासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई का करत नाही . असा प्रश्न पालकांपुढे निर्माण होत आहे .
stay connected