पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जिल्हाध्यक्ष जमीरअहमद शेखने दिले निवेदन*

 *पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जिल्हाध्यक्ष जमीरअहमद शेखने दिले निवेदन*




मिरज शासकीय दूध डेअरीच्या 52 एकर भूखंडावर अद्ययावत

मिरज प्रांत व तहसील कार्यालय,मिरज म.गांधी पोलीस ठाणे,मिरज महापालिका कार्यालयासाठी प्रशस्त नवीन इमारत,मिरज कोर्ट नवीन इमारत,नवीन सुसज्ज मार्केटची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीरअहमद शेखनी मिरज मतदार संघाचे आमदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी 


मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत असलेले मिरज शासकीय दूध डेअरीची मोक्याची 52 एकरची जागा मिरज नगरीच्या विकासासाठी वापर करावा.एकच अशी भव्य

दिव्य इमारत उभी करून एकाच छताखाली मिरज शहरासहित तालुक्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालय उभे झालेस,मिरजेच्या विकासात व वैभवात भर पडणार असुन व नागरिकांची खूप मोठी सोय होणार असुन त्याचा फायदा मिरज शहरासह मिरज तालुक्यातील इतर गावांना होणार आहे.मिरजेला महानगरपालिकेची कार्यालयाची इमारत नगरपालिकेचा विचार करून बांधलेली होती व आहे. मिरज शहराचा विस्तार होऊन मिरज शहरातील उपनगरांची संख्या वाढलेली आहे.मिरज महानगरपालिकेला नविन कार्यालयासाठी नविन प्रशस्त सर्वसोयीनीयुक्त इमारत असणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच मिरज प्रांत व तहसिल कार्यालय,सब-रजिस्ट्रार ऑफीस,मिरजेतील सर्व तलाठी कार्यालये,शासकीय पाटबंधारे कार्यालय,भूमापन कार्यालय,कृषि कार्यालय,मुख्य अग्निशमन कार्यालय तसेच मिरज न्यायालय, नवीन प्रशस्त भाजी मंडईची ईमारत,मिरज महानगरपालिका विभागीय नवीन दवाखाना,मिरज शहर गांधी पोलीस ठाणेसाठी नवीन इमारत व शासकीय महाविद्यालयसहीत ही सर्व कार्यालये 52 एकर जागेचा उपयोग करून 40 एकर जागेमध्ये बांधकाम करून 12 एकर जमीन सार्वजनिक पार्किंगसाठी उपयोग केल्यास मिरजेच्या ट्रॅफीकचाही प्रश्न सुटणार आहे.म.गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी झाल्यास अनेक गैरसोई टाळल्या जाणार आहेत.तसेच एकाच इमारतीच्या छताखाली सर्व कार्यालये उपलब्ध झाल्यास नागरिकांचे हेलपाटे व वेळ वाचणार आहे.तसेच शासकीय कामाला जलद चालना

मिळणार आहे.शासनाने या ठिकाणी दुकान गाळ्यांचेही नियोजन केल्यास बेरोजगारांना रोजगार आणि शासनाला उत्पन्न मिळेल.यासह शासनातर्फे याजागेवर आपली





कार्यालये उभा करून ही जागा विकसीत करावी.कारण मिरज शहर हे सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून लगतच मिरज रेल्वे जंक्शन,मिरज बस स्टॅन्ड,मिरज सिटी बस स्टॅन्ड,अनेक नामांकित हॉस्पिटल अत्यंत जवळच असून मिरज तालुक्यासहीत जिल्ह्यातील लोकांच्या सोईचे होणार आहे.सदर मिरज शासकीय दूध डेअरी जागेचा आम्ही केलेल्या मिरज तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी ही मागणी असुन.या जागेचा इतर कोणत्याही कारणास्तव किंवा संस्थेला देणाचा प्रयत्न झालेस भिम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्या तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष

जमीरअहमद शेखनी दिला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नक्कीच आपल्या निवेदनाचा विचार करून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या कार्यकर्त्यांना नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिले यावेळी जमीरअहमद शेख अजय बाबर साद गवंडी,सलीम कनवाडे,नासिर शेख सहित शोहेब कनवाडे निवेदन देताना कार्यकर्ते उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.