अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत- सत्कार करुन जागतिक योग दिन साजरा

अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत- सत्कार करुन जागतिक योग दिन साजरा 




 शतकपुर्तिकडे वाटचाल करणाऱ्या श्री अमोलक संस्थेचे अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विदयार्थ्यांचे स्वागत- सत्कार करुन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला . बीड जिल्हयातील अतिशय नावाजलेल्या श्री अमोलक संस्थेचे अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये सालाबादप्रमाणे संस्थेवर व शाळेवर या वर्षीही पालकांनी व विदयार्थ्यांनी भरगच्च असा विश्वास दाखवून आपल्या पाल्यांचा शाळेमध्ये प्रवेश निश्चित केले. संस्थेच्या  व शाळेच्या प्रगतीसाठी पालकाणी नेहमीच आपले योगदान देऊन संस्थेचे मनोबल वाढविलेले आहे . शाळेमध्ये प्रवेश घेणा - या या सर्व विदयार्थी विदयार्थीनींचे ढोल ताशाच्या गजरात औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले . 





यावेळी इंग्लिश स्कुल 

चे प्रिन्सिपॉल महामुनी मॅडम, सय्यद मॅडम, कोळपकर मॅडम, जैन मॅडम, वेदपाठक मॅडम, मोरे मॅडम, नालकोल मॅडम, गांगरडे मॅडम, शेळके माऊशी, श्री पवार सर्व शिक्षक, शिशीकेतर कर्मचारी वृंद उपस्थीत होते.  तसेच जागतिक योग दिनाच्या निमिताने विदयार्थांच्या बोउधिक व शारिरिक विकासासाठी त्यांना  योगआभ्यासाचे महत्व समजावे म्हणून गांधी महाविदयालयाचे योग गुरू प्रा.प्रशांत मेहेर सर यानी योगासने करून  विद्यार्थ्याना उत्तम मार्गदर्शन केले.  हा   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोलक संस्था व   संस्थेचे      समनव्ययक डॉ. जे.एम.  भंडारी सर, प्रा.  पडोळे सर, ललवाणी सर, पेठकर सर यानी विशेष सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.