जरांगे यांच्या मुस्लीमांना आरक्षण देण्याच्या मागणीला पाशा पटेलांचा पाठिंबा ; पहा काय म्हणाले पाशा पटेल ?

 जरांगे यांच्या मुस्लीमांना आरक्षण देण्याच्या मागणीला पाशा पटेलांचा पाठिंबा ; पहा काय म्हणाले पाशा पटेल ?



माझी गरिबी व्यवसायावर आधारीत आहे. शेतीत गरीबी आहे, म्हणून घरात गरीबी आहे. अन्यथा घरात गरिबी नसती. जन्मोजन्मी शेती करतो असेही पाशा पटेल यांनी सांगितले.मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणामुळे देशभर ते ओळखले जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता मुस्लीमांनाही आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपाचे नितेश राणे यांनी धर्माआधारे आरक्षण देता येणार नाही असे म्हटले आहे. परंतू आता मुस्लीमातील शेतकरी जमाती उच्च असल्या तरी शेतीच्या व्यवसायाच्या आतबट्ट्याच्या व्यवहाराने गरीबी सोसत आहेत. यासंदर्भात देहू येथील पाशा पटेल यांनी जरांगे यांच्या मुस्लीमांना आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘साल 1168 पासून आम्ही कुणबी आहोत. शेतकऱ्यालाच कुणबी म्हटलं जाते. जरांगे यांनी कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर आमच्या गावात अधिकारी आले, त्यांनी विचारले की तुम्ही कोण तर गावातील सर्वांनी सांगितले आम्ही कुणबी आहोत.’



पुणे जिल्ह्यातील देहू येथील पाशा पटेल यांनी पुढे म्हटले आहे की साल 1168 पासून आम्ही कुणबी आहोत. शेतकऱ्याला कुणबी म्हटलं जातं. कुणबीला प्रमाणपत्र मिळाव अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ती मागणी केल्यानंतर आमच्या गावात अधिकारी आले. त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात गावातील सर्वांनी सांगितलं पाशा पटेल हे कुणबी आहेत. सन 1156 पासून आजतागायत नोंदी कुणबी म्हणून असेल तर मी खरंच कुणबी आहे. आणि मला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असेल तर मला आनंद आहे असेही पटेल पुढे म्हणतात.


शेतीत गरीबी म्हणून घरात गरीबी

मी मुस्लिम, सय्यद आहे, उच्च वर्णीय आहे. पण मला कधी अस वाटलं नाही की मला आरक्षण मिळेल, त्यामुळे कधीच प्रयत्न केले नाहीत. आता कुणबी म्हणून ते मिळणार असेल तर मी या आरक्षणाचे स्वागत करतो. मुलाला नाही पण आपल्याला नातवाला तरी याचा फायदा होईल असे पाशा पटेल सांगतात. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कुणबी प्रमाण पत्र मिळणार असेल तर आम्हाला आनंदच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील काय बोलले ? त्यावर मी काही बोलू शकत नाही. परंतू मी अर्थशास्त्रावर बोलणारा माणूस आहे. माझी गरिबी ही जातीवर आधारीत नाही. माझी गरिबी व्यवसायावर आधारीत आहे. शेतीत गरीबी आहे, म्हणून घरात गरीबी आहे. अन्यथा घरात गरिबी नसती. जन्मोजन्मी शेती करतो असेही त्यांनी सांगितले.

जातीचं आणि धर्माचं पेव फुटणार आहे. अशी वेळ येईल ही भाकर एक आणि खाणारे चार म्हटलं की भांडणं शंभर टक्के होतंय असे पाशा पटेल यांनी सांगितले. गेल्या 70 वर्षात शेतीवर खूप मोठा अन्याय झाला आहे. माणसं खाऊ- पिऊन सुखी असल्यास कुणी जाती – धर्माकडे जाणार नाहीत. जरांगे पाटील ज्या समाजाचं नेतृत्व करीत आहेत. हे आंदोलन चालू आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. शेती करणारा समाज आहे. दिल्लीत म्हणालो की रस्त्यावर जरांगे यांच्यासोबत एक कोटी लोक आले. या लोकांच्या मनात कास्टचं दुःख होतं, जातीच्या माध्यमातून ते रस्त्यावर आले असेही पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.