आष्टीत माजी आ. भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा
आष्टी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, आष्टी, पाटोदा, शिरूर (का.) विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात दि.२१ जुन रोजी सकाळी ७ वा. संपन्न झाला. योग शिबराची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. योग गुरू प्रा.भ.दे. जगताप यांनी उपस्थितांना अनेक प्रकारचे असणे करून दाखवली त्याच बरोबर त्यांच्याकडून ती करून घेतली. यावेळी बोलतांना माजी आ. भीमराव धोंडे साहेब म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये 'जागतिक योग दिन' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे आणि समाधान सर्वात मोठी संपत्ती हे केवळ योगाद्वारेच प्राप्त होते. जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित युवा नेते अजय दादा धोंडे,अभयराजे धोंडे, झुंजार नेता उपसंपादक श्री. उत्तम बोडखे,प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी. राऊत,योगगुरु प्रा.भा.दे. जगताप, श्री.लकडे साहेब, पशुसंवर्धन अधिकारी श्री.जाधव, प्राचार्य डॉ. एस. आर.आरसुळ, प्राचार्य डॉ. बी . बी. खेमगर, प्राचार्य डॉ. कोल्हे सुनिल, प्राचार्य संजय बोडखे, आनंद शैक्षणिक संकुल मधिल सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
stay connected