लोकशाही पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी रमेश खिळदकर
आष्टी प्रतिनिधी- तालुक्यातील कानडी खुर्द येथील प्रा. डॉ. रमेश जयवंत खिळदकर यांचे लोकशाही पत्रकार संघाच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. या निवडीचे पत्र लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांनी त्यांना नुकतेच प्रधान केले. त्यांच्या या निवडीबद्दल धानोरा येथील तेजवार्ता न्यूज चैनल कार्यालयामध्ये सोमवार दिनांक १० जून रोजी संपादक सय्यद बबलू भाई, पत्रकार निसार शेख, अभिनेते नंदू काळे, कॅमेरामन हमजान शेख यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार भीमरावजी धोंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, डॉ अजय धोंडे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य भगवानराव वाघुले, उपप्राचार्य कैलास वायभासे यांच्यासह मित्र परिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
stay connected