कष्ट व गुणवत्तेच्या बळावर या मुलांनी अल्पावधीत यश संपादन केले ----आ.सुरेश धस

 कष्ट व गुणवत्तेच्या बळावर या मुलांनी अल्पावधीत यश संपादन केले
----आ.सुरेश धस 

***********************************

बळेवाडीत आ.सुरेश धस यांच्या हस्ते भूमीपुत्रांचा विशेष सन्मान संपन्न

***********************************



********************************

आष्टी (प्रतिनिधी)

अतिशय खडतर परिस्थितीत या यशामागे विद्यार्थी त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण,पालक व नातेवाईक यांचे मोलाचे योगदान आहे. प्रामुख्याने आपल्या परिसरातील मुले ही मैदानी खेळात एक पाऊल पुढे असल्याने त्यांना विविध स्पर्धात्मक युगात विशेष गुणांची मदत होत आहे.कोरोनाच्या नंतर आपली मुले खेळाचे खुले मैदान विसरून गेले आहेत. येणाऱ्या पिढीच्या शारीरिक क्षमतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.ग्रामीण भागात शिक्षण घेत आपल्या कष्ट व गुणवत्तेच्या बळावर या मुलांनी अल्पावधीत यश संपादन केले आहे. हा नागरी सत्कार संपन्न होत असताना अतिशय आनंद होतोय असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

ते बळेवाडी (पारगाव जो.) ता.आष्टी येथे गावातील विविध शासकीय सेवेत भरती झालेल्या व निवड झालेल्या भरती प्रक्रियेतून नियुक्ती मिळालेल्या तरुण-तरुणींचा नागरी सत्कारात बोलत होते. 

यामध्ये निलेश रामदास भोसले (म.न.पा), योगेश अशोक भोसले (महाराष्ट्र पोलिस),  राहूल गहिनीनाथ भोसले (इंडियन आर्मी),श्री. कृष्णा भिमराव भोसले (MPSC परिक्षेतून सहायक नगर रचनाकार), प्रवीण बाळासाहेब भोसले (CISF- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल), कु. स्नेहा वसंत भोसले (कृषी सहायक), पारगाव जो. येथील सुरेश देविदास भोराडे (कृषी सहायक) यांची निवड होऊन काही जण आपल्या कर्तव्यावर रुजू झालेले आहेत. यांपैकी काही सत्कारमूर्ती उपस्थित नसल्याने त्यांचा पालकांचा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.अशोक महाराज भोसले,किसन महाराज,प्रा.ब्रह्मदेव भोसले सर,ढोबे सर,माजी सरपंच गणेश मोकाशे, सरपंच पोपट शिरोळे,आजिनाथ भोसले

उपसरपंच रामेश्वर मोकाशे, ज्ञानेश्वर भोसले मेजर,साबळे सर, वसंत भोसले,आदिनाथ भोसले उपस्थित होते.

 यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले,तंत्रज्ञानाच्या युगात सर्व साधने व यंत्र योग्यतेनुसारच वापरले पाहिजेत.परंतू त्यामधून आपल्याला जे पाहिजे ते मिळते.तर काही त्याचा दूरउपयोग करतात.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आमदार सुरेश धस यांनी कौतुक केले.पुढे बोलताना आ.धस म्हणाले,स्वतःच्या गावाला कधी विसरून नका सत्कारमूर्तीने केलेल्या कष्टाने आज शासकीय नोकरीला निवड झाली आहे. त्यांचा आदर्श समोर असलेल्या विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे .तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा महिलांनीही मुलांना मोबाईल देऊ नये गावामध्ये सर्व पालकांनी मुलांना आठवड्यातून एक तरी दिवस मैदानावर देण्यासाठी पाठवावे तसेच म्हणून तसेच कुटुंबातील मुलांना खेळाची आवड निर्माण करावी तसेच कुटुंबातील सदस्यांनी ही मोबाईलचा वापर कमी करून भाडवणे गरजेचे आहे.गावचा विकास करण्यासाठी तरुण युवकांनी पुढे येण्याचे आवाहनही आ.धस यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन आजिनाथ भोसले यांनी केले त्यांच्या आग्रहास्तव आ.धस यांना  कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले असे मत आ.धस यांनी व्यक्त केले. अश्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने मुलांना प्रोत्साहन मिळेल व यातून अनेक मुले घडू शकतात असेही शेवटी आमदार धस म्हणाले.

यावेळी रामेश्वर बळे,संजय जेवे, राहुल जगदाळे, सचिन लोखंडे,राम धुमाळ, निशांत जेवे, रामराव घरात, प्रदीप कुमठेकर, पप्पू कात्रजकर,चंद्रकांत भोसले,ब्रह्मदेव भोसले, राम पोटफोडे,सुरेश भोसले, ज्ञानेश्वर भोसले, सचिन बोराडे यांच्यासह प्रमुख मान्यवर, विद्यार्थी,तरूण वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.