*मा.संतोष पाटील वाहन निरीक्षक बीड यांच्यातर्फे नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्यासाठी मदत*
================================================
*आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.*
*या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे.*
*या अनाथ,निराधार मुलांना आता नव्याने शाळा चालू झाल्यामुळे शालेय साहित्याची खूप गरज होती.म्हणून फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आणि सामाजिक बांधिलकी जपत बीड येथील कर्तव्यदक्ष वाहन निरीक्षक संतोष पाटील साहेब यांनी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील अनाथ निराधार मुलांना शालेय साहित्याची गरज असल्यामुळे या मुलांना आवश्यक असलेले शालेय साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपत या मुलांची गरज लक्षात घेऊन त्यांना शिक्षण घेता यावे या उदात्त भावनेने मदत केली.*
*मूळचे पालघर जिल्ह्यातील असणारे पाटील साहेब सध्या बीड येथे मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सोडवतात.बीड सारख्या दुष्काळी भागात इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडत असताना सामजिक बांधिलकी जपत आहेत त्यांच्या या कार्यास नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा*
*शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी मनापासून आभार मानले.*
stay connected