आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने मांजरा साळ नदी संगमावरील पुलाचा प्रश्न सुटला

 आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने मांजरा साळ नदी संगमावरील पुलाचा प्रश्न सुटला 




नगर उपाध्यक्ष शरद बामदळे यांनी अत्याधुनिक मशनरी वापरून पुलाचे बांधकाम केले एकदम टकाटक 

पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मांजरा व साळ नदी संगमावर असलेला पुल काही वर्षांपूर्वी पुराच्या पाण्याने वाहुन गेल्यामुळे शहरातील नागरिकांचे प्रवास करताना प्रचंड हाल होत आसत ही बाब आमदार सुरेश आण्णा धस यांच्या निदर्शनास येताच आमदार सुरेश आण्णा धस यांनी मांजरा व साळ नदी संगमावरील पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने भाकरे वस्ती, लवुळ वस्ती,बामदळे वस्ती, हिंदू स्मशानभूमी कडे जाणार्यी पुलाचा प्रश्न मार्गी लागला आसुन पाटोदा शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला मांजरा व साळनदी संगमावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागल्या मुळे या भागातील नागरिकांना रहदारी साठी पावसाळ्यात त्रास होणार नसुन पाटोदा शहरात पहिल्यादांच अत्याधुनिक मशनरी वापरून नगरपंचायतचे नगर उपाध्यक्ष शरद बामदळे यांनी मांजरा व साळनदी संगमावरील पुलाचे काम चालू केले असल्यामुळे  शहरातील नागरिक पुलाचे काम पाहुन नगर उपाध्यक्ष शरद बामदळे यांच्या उत्कृष्ट कामाचे कवतूक करत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.