धनुभाऊ आता तरी शेतकर्यांना खते बी-बियाणे घेण्यासाठी २०२० व २०२३ चा पिकविमा द्या-आप संघटन मंत्री प्रदिप थोरवे
धनुभाऊ आपण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा ची रक्कम जमा झाली नाही तर दिवाळी साजरी करणार नाही हा शब्द दुसऱ्या दिवाळीच्या आधी तरी खरा करा -आप संघटन मंत्री प्रदिप थोरवे
बीड जिल्ह्यात २०२० व २०२३ मधे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती होती. उत्पन्नात मोठी घट झाली होती. त्यामुळे शेतीला खर्च झालेला देखील शेतकऱ्यांना शेतातून मिळाला नाही.पावसाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला. शेतकरी हवालदील झालेला होता. म्हनुन शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी अनुदान व विमा कंपनीने पिकविमा जाहीर केला होता. २०२३ मधे दिवाळीच्या अगोदर कृषिमंत्री आणि बीड चे पालकमंत्री म्हणून आपण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा ची रक्कम जमा झाली नाही तर दिवाळी साजरी करणार नाही असे जाहीर आश्वासन शेतकऱ्यांना पत्रकार परिषदेत दिले परंतु दुसरी दिवाळी जवळ आली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदान याचा एक रुपयाही जमा झाला नाही म्हणून बीड जिल्ह्यमधे २५% अग्रीम पिकविमा मंजुर असुन त्यामधे एकदोन पीके समाविष्ट न करता सर्व पिके समाविष्ट करुन १००% विमा देऊन शेतकर्यांना धीर द्यावा. यावर्षीच्या खरीप पिकांची लागवड करण्याची वेळ आलेली असताना पीकविमा रक्कम शेतकन्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यास शेतकऱ्यांना खते बी-बियाणे घेण्यासाठी मदत होईल. अशाप्रकारची मागणी आप चे महाराष्ट्र प्रदेशसंघटन मंत्री प्रदिप थोरवे यांनी पत्राद्वारे केली आहे.
stay connected