पुणे:- लेखक व कवी श्री.धनंजय इंगळे सरांचा वाढदिवस माई बालभवनमध्ये कवितांच्या पावसात साजरा.
माई बालभवन आश्रम,मामुर्डी येथे मंगळवार दिनांक ११ जुन २०२४ रोजी श्री.धनंजय इंगळे सरांचा वाढदिवस साहित्यिक वारकऱ्यांनी मिळून साजरा केला.त्यात धम्माल केली,कवितांचा पाऊसच पाडला.त्यात सर्व ओलेचिंब भिजले.छोटासा केक कापून अन् फुल न फुलाची पाकळी म्हणून थोडासा खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत करून वाढदिवस साजरा केला.लहान-मोठ्या प्रत्येक वयोगटातील अनाथ अंध मुलींसोबत आनंद साजरा केला.या प्रसंगी कवी धनंजय इंगळे,कवी अशोक वाघमारे,
कवी अशोक सोनवणे,कवयित्री प्रतिमाताई काळे,कवयित्री मेहबूबा शेख मॅडम,कवयित्री योगिता कोठेकर मॅडम,कवयित्री कमल आठवले मॅडम यांनी आपल्या कविता साजऱ्या केल्या.तसेच मनोगत ही व्यक्त केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कवी कवयित्रींचे माई बाल भवन चे संचालक श्री.मधुकर इंगळे सर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.तसेच श्री प्रविण देशपांडे सर, मा.इंगळे सर,तेथील मुलींनी तेथील कार्य कसे चालते याचीही संपूर्ण माहिती दिली.आश्रमाची व्यवस्था श्री प्रवीण देशपांडे सर व श्री मधूकर इंगळे सर बघतात.अतिशय सूंदर पद्धतीने मुलींची काळजी घेतात.काही मुली ब्लाइंड फुटबॉल स्पर्धेत नॅशनल ला खेळून विजयी झाल्या आहेत.
आपण समाजाचे देणे लागतो,निसर्गाचे देणे लागतो आणि त्यासाठी अशा वृद्धाश्रम,बालाश्रम,अनाथाश्रम,मूकबधीर शाळा,यांच्यासोबत राहून आनंदाचा क्षण साजरे करावे असे आवाहन धनजंय इंगळे सरांनी व सौ.प्रतिमा काळे यांनी सर्वांना केले.तो जो आनंद आहे म्हणण्यापेक्षा मानसिक समाधान आहे,ते कोठून च विकत घेता येत नाही.जे जे आपल्या जवळ आहे,ते ते देतची जावे..अन् पुढे पुढे चालावे.
stay connected