कड्यात बजरंग सोनवणेंच्या विजयाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून केला आनंदोत्सव साजरा

 कड्यात बजरंग सोनवणेंच्या विजयाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून केला आनंदोत्सव साजरा.

-----------------------------------------





आष्टी/प्रतिनिधी

राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा 6 हजार 585 मतांनी पराभव केला. रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत सोनवणेंनी बाजी मारताच शरद पवार गटात  व मित्र पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सोनवणेंचा हा विजय मोठा मानला जात आहे.





दरम्यान, मतमोजणीत

सोनवणेंचा कमी मतांनी विजय झाल्याचे पाहून मुंडेंनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. त्यात सोनवणेंचा 6 हजार 585 मतांनी सोनवणे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.त्यानंतर आष्टी तालुक्यातील कडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आष्टी तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे,ठकाराम दुधावडे,डि.के.कर्डिले, विनोद पवार,छगन कर्डिले,रामभाऊ कर्डीले,संभाजी इंगवले,गणेश गुंजाळ, काकासाहेब कर्डिले,रफीकभाई शेख,शाहु नाथ, काशीनाथ कर्डिले,आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.