आ.सुरेश धस यांच्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याला अखेर यश
अखेर आष्टी नगरपंचायत शहर विकास आराखडा मंजूर
----नगराध्यक्ष जिया बेग
***********************************
**********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहराचा २०१५ पासून प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा अखेर आ.सुरेश धस यांच्या शासन दरबारी वेळोवेळीच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आता शहराचे रुपडे बदलणार असून हा शहर विकास आराखडा मंजूर झाल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व आमदार सुरेश धस यांचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी जाहीर आभार मानले आहेत.
आष्टी नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बपुढे बोलताना नगराध्यक्ष जिया बेग म्हणाले,आष्टी नगरपंचायत २०१५ साली नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली नगरपंचायतचा कायापालट झाला आहे.अखेर २०१५ पासून शहराचा विकास आराखडा हा प्रलंबित होता.या आराखड्याबाबत आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रथम नगराध्यक्ष नवाब खान यांनी या आराखड्याचे सर्वेक्षण केले होते ते आत्ता अखेर नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यावश्यक असलेला प्रलंबित प्रश्न विद्यमान नगराध्यक्ष जिया बेग यांच्या कार्यकाळात मंजूर झाला आहे.मागील महाविकास आघाडीच्या काळात या शहर विकास आराखडा मंजूर करण्यासाठी अनेक अडथळे आले होते.मात्र, आत्ता महायुती सरकारच्या काळात सरकारकडे सततच्या पाठपुराव्याने आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने हा शहराचा आराखडा मंजूर करून घेण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये येणाऱ्या पुढील 35 वर्षाच्या अनुषंगाने करण्यात येणारे विकास कामे व शहर विकासाला चालना मिळून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.यामध्ये बेघर कुटुंबांसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून बेघरांना आता घरकुल मिळणार आहेत.तर बेरोजगार युवकांना शहरात ठिकठिकाणी कॉम्प्लेक्स होणार आहेत.यामध्ये शहरातील अनेक रस्ते पूर्ण तर काही रस्ते अपूर्ण राहिले आहेत त्यामध्ये अण्णाभाऊ साठे ते शनी मंदिर १५ मि.पूर्ण,शनी मंदिर ते कमान वेस १२ मि.पूर्ण,कमानवेश ते तलवार नदी ९ मि. पूर्ण,शनी मंदिर ते शेकापुर रस्ता १२ मि.अपूर्ण,आनंद ऋषी चौक ते संभाजी चौक १२ मि.पूर्ण, संभाजी चौक ते भाजी मार्केट ९ मि. पूर्ण, भाजी मार्केट ते मेहेर गल्ली ९ मि. पूर्ण,श्री भोज यांचे घर ते शेकापूर रोड ९ मि. पूर्ण, कमानवेस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड १२ मि.पूर्ण,कमानवेस ते संभाजी चौक ९ मि. पूर्ण,पठाडे कॉम्प्लेक्स ते अनिल भैय्या निकाळजे चौक ९ मि. पूर्ण, द्वारके यांचे घर ते नगर बीड रोड १२ मि. अपूर्ण, सानप हॉस्पिटल ते बाजारतळ १२ मि.अपूर्ण, टिपू सुलतान चौक ते बुद्धविहार ९ मि.पूर्ण,याच बरोबर शहरात विविध ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स ला मंजुरी मिळाली आहे.या शहर विकास आराखडाला मंजुरी दिल्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आ.सुरेश धस यांचे विशेष आभार नगराध्यक्ष जिया बेग यांनी मानले आहेत.
********************************
आष्टी शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून युवकांना मिळणार रोजगार
----- नगराध्यक्ष जिया बेग
********************************
आष्टी नगरपंचायत अंतर्गत लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने आष्टी शहराचा कायापालट होत आहे.त्यात विकास आराखड्याची भर पडल्याने अनेक प्रलंबित विकास कामे आता मार्गी लागणार असून यामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आष्टी शहरात ठीकठिकाणी अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहेत.यातून युवकांच्या हाती आता रोजगार मिळणार असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी यावेळी सांगितले.
stay connected