श्री अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला


श्री अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला



श्री अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी ते दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ उप महाव्यवस्थापक होते. श्री मालखेडे यांनी दि. ३१.५.२०२४ रोजी सेवानिवृत्त झालेले श्री धनंजय नाईक यांची जागा घेतली.


भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आईआरटीएस) १९९१ च्या बॅचचे अधिकारी, श्री मालखेडे हे एक उच्च शिक्षित यांत्रिक अभियंता आहेत आणि त्यांच्याकडे विविध क्षेत्रीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या क्षमतेमध्ये काम करण्याचा अफाट आणि समृद्ध अनुभव आहे. 


श्री मालखेडे यांनी यापूर्वी मध्य रेल्वेवर ऑपरेटिंग, व्यावसायिक विभाग आणि सामान्य प्रशासन अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य दक्षता अधिकारी (वाहतूक) आणि उपमुख्य संचालन व्यवस्थापक (मालवाहतूक) म्हणून काम केले आहे.


 श्री मालखेडे यांनी २०१३-१५ या वर्षात जेव्हा लुमडिंग-बदरपूर-सिलचर लाईनचे गेज-रूपांतरण चालू होते तेव्हा उत्तर पूर्व सीमावर्ती रेल्वे (एनएफआर) येथे मुख्य माल वाहतूक व्यवस्थापक (सीएफटीएम) यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि लोअर आसाम यांसारख्या दूरच्या राज्यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन आणि खात्री केली.


 त्यांनी २०१९ ते २०२२ या कालावधीत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबली विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), म्हणून काम केले. त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीत, त्यांनी १९९९-२००४ दरम्यान प्रतिनियुक्तीवर काम केले आहे, जिथे त्यांनी औरंगाबाद येथे इनलँड कंटेनर डेपो (आईसीडी) ची स्थापना केली आहे आणि नागपूर येथे इनलँड कंटेनर डेपोचे नेतृत्व देखील केले आहे. ते २०१५ ते २०१९ या कालावधीत आईआरसीटीसी, पश्चिम विभागाचे गट महाव्यवस्थापक म्हणूनही प्रतिनियुक्तीवर होते. 


श्री अरविंद मालखेडे हे चेवनिंग गुरुकुलचे विद्वान आहेत. २००९ च्या दरम्यान, त्यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (एलएसई) मध्ये लीडरशिप आणि मॅनेजमेंट प्रोग्रामचा अभ्यास केला आणि युरोपमधील आंतरराष्ट्रीय संस्थांशी संपर्क साधला. 


मध्य  रेल्वेला त्यांचा प्रचंड अनुभव  विविध आव्हानात्मक कार्ये आणि लक्ष्ये पूर्ण करताना आणखी मोठे वैभव प्राप्त करण्यास मदत करेल.

--------------------------------------------






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.