जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घ्यावी - राज्यपालांना खासदार बजरंग सोनवने यांचे पत्र
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला तात्काळ सूचना करणे बाबत खा . बजरंग बाप्पा सोनवने यांनी पाठवले राज्यपाल यांना पत्र
मनोज जरांगे पाटील हे 8 जून 2024 पासून आंतरवाली-सराटी जि. जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांनी गेली पाच दिवसापासून अन्न, पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालुन श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सूचित करावे, अशी विनंती खा . बजरंग बप्पा सोनवने यांनी राज्यपाल महोदयांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे .
stay connected