राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा दोन दिवसांत करणार - आमदार रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आतापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. अशातच आता पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत ‘राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा दोन दिवसांत करणार’ असं म्हटलं आहे. तसेच ‘दोन दिवस थांबा फार मोठा स्फोट आहे’, असं सूचक विधानही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
stay connected