फुले, शाहू, आंबेडकर राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलन साहित्य चळवळीतील साहित्यिकांना मिळणार पुरस्काराची मेजवानी

 फुले, शाहू, आंबेडकर राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलन
साहित्य चळवळीतील साहित्यिकांना मिळणार पुरस्काराची मेजवानी


सुनील शिरपुरे/यवतमाळ



दर्यापूर- पिंपळोद येथील कार्यरत  

संस्था कला फाऊंडेशन महाराष्ट्राच्या काणाकोप-यातच नव्हे तर देश विदेशात आपले नावलौकिक केले आहे. कला फाऊंडेशन रजि.नं.एफ २७३१३ द्वारा आजवर अनेक पुरस्कार सोहळे, साहित्य संमेलन आयोजित करून कित्येक होतकरू कलावंत, साहित्यिकांना त्यांच्या कार्याच्या मोबदल्याच्या रुपात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील म्हणजेच २०२४ मध्ये कला फाऊंडेशनच्या वतीने कर्तबगार स्त्री-पुरुषांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण, गायन, नृत्य, शैक्षणिक, चित्रकला, वकृत्व, सामाजिक, पथनाट्य, अभिनय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गुणगौरव होत आहे. आपले संत, महापुरुष निस्वार्थपणे समाजाची सेवा करून गेले त्यांच्याच प्रेरणेने आपणही समाजात वावरत असताना साहित्याच्या किंवा कुठल्याही क्षेत्रात अगदी निस्वार्थपणे सेवा करावी याचं उद्देशाने साहित्य चळवळ बळकट करून एक हक्काच व्यासपीठ मिळावं यासाठी फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. आपल्या कार्याला, साहित्याला गती व धार मिळावी याकरीता पुरस्कार देण्यात येत आहे. यात साहित्यरत्न, कलागौरव, निसर्ग प्रेमी, कृषिरत्न, आदर्श शिक्षक, वृक्ष मित्र, डॉ.अब्दुल कलाम, अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव, संत गाडगेबाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ.भिमराव आंबेडकर समाज सुधारक अशा ११ प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपल्या कार्याची माहिती व बायोडाटा कला फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत ना. दामले मु.पो.पिंपळोद ता.दर्यापूर जि.अमरावती ४४४७०६ या पत्त्यावर किंवा पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असल्यास ८६०५५२१३६९ या नं.वर ३० जुलै पर्यंत व्हाट्सअप करावे. असे संस्थेद्वारा आवाहन करण्यात येत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.