कडा येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाची आ. सुरेश धस यांच्याकडून पाहणी .

 कडा येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाची आ. सुरेश धस  यांच्याकडून पाहणी .

———————

पुलाचे काम तात्काळ करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना



आष्टी ( प्रतिनिधी ) -  कडा येथील नगर बीड राष्ट्रीय महामार्गावरील  पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसुन या कामाची रविवारी आ.सुरेश धस यांनी पाहणी करुन लवकरात लवकर काम करण्यासाठीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून जुना पूल पूर्णपणे पाडून नष्ट केला आहे त्यामुळे मातीचा भराव टाकून दुसरी कडून वाहतूक वळवली आहे.मात्र जर कडा नदीला पाणी आले तर हा भराव वाहून गेल्यास राष्ट्रीय महामार्ग बंद पडू शकतो यासाठी आमदार सुरेश धस यांनी स्वतः रविवारी प्रत्यक्ष पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांना लवकरात लवकर काम करून घेण्यासाठीच्या सूचना दिल्या.


आष्टी कडा साबलखेड या रस्त्याचे काम मागच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झाले.  हे काम खूप संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे मोठ्या जिकरीचे झाले आहे . कोणताही रस्ता सलगपणे पूर्ण झालेला दिसत नाही.  त्यातच कडा येथे कडी नदीवर असलेला पूल पाडून तिथे नवीन पुल बांधायचा आहे . रहदारीच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे.  मात्र पुलाचे  पाडकाम केल्यानंतर आतापर्यंत फक्त पूलाच्या भिंती अर्ध्या उंची एवढ्या बांधण्यात आलेल्या आहेत.  आता पावसाळा सुरू झाला आहे.  नदीला जर पाणी आलं तर हे काम पूर्ण कसे होईल हा ही प्रश्न आहेच.  याशिवाय सध्या या मार्गावरील वाहतूक ज्या वळण रस्त्याने सुरू आहे तो रस्ता जर वाहून गेला तर नागरिकांनी येजा करायचे कसे हा ही मोठा प्रश्न आहे.  त्यामुळे रविवारी आ.धस यांनी या कामावर भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नदीला पाणी आल्यास महामार्ग बंद होऊ शकतो यासाठी पुलाचे काम जलद गतीने करुन वाहतुकीसाठी पूल खुला करावा अशा सूचना दिल्या . यावेळी कडा गावचे सरपंच युवराज पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी ,उपसरपंच बाळासाहेब कर्डिले ,सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे ,रमेश शिरोळे,यांच्यासह कडा गावातील नागरिक उपस्थित होते.

**************** 

कडा गावाच्या नागरिकांसाठी संपर्काच्या दृष्टीने आणि नगर बीड वाहतुकीसाठी कडी नदीवरील पूल महत्त्वाचा आहे. हा पुल लवकर बांधून पूर्ण झाला नाही तर सर्व वाहने धामणगाव किंवा शेरी खुर्द मार्गे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही .







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.