सिनेकॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हिंजवडी पुणे यांच्या कडून शाळेस संगणकांची भेट

 *सिनेकॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हिंजवडी पुणे यांच्या कडून शाळेस संगणकांची भेट*



-------------------

 आष्टी( रिपोर्टर) सिनेकॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हिंजवडी चे डायरेक्टर श्री.रफिक नदाफ सर, राधाकृष्ण सिताराम गायकवाड सर यांच्याकडून जि.प.प्रा.शा कारखेल खु व जि.प.प्रा.शा बर्डे वस्ती कारखेल खु या शाळा ग्रामीण भागात असून येथील मुलांना संगणकाचे ज्ञान व्हावे यासाठी अंभोरा केंद्राचे माजी केंद्रीय मुख्याध्यापक कारखेल खु गावचे भूमी पुञ आदर्श सेवा निवृत्त शिक्षक महादेव बाबा खुडे गुरूजी यांच्या सततच्या प्रयत्नामुळे दोन्ही शाळेला संगणक एक - एक संच देण्याची विनंती काही महिन्यांपूर्वी केली होती त्यांच्या मागणीला यश मिळाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही शाळेला प्रत्येकी एक - एक संगणक देण्यात आले आहेत व दुसरे आदर्श सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ घुले गुरूजी यांनी पण दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक-एक लाऊडस्पीकर व सर्व विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आले आहेत याबद्दल यांचे कारखेल खु चे आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक, आष्टी तालुक्याचे कर्तव्य दक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव साहेब,विस्तार अधिकारी सिमाताई काळे /टकले,केंद्र प्रमुख जावेद पठाण,केंद्रीय मुख्याध्यापक अशोकराव शिंदे, कारखेल खु चे मुख्याध्यापक राजेंद्र शेकडे सर, बर्डे वस्ती कारखेल खु चे मुख्याध्यापक बाळासाहेब शिरसाठ सर व शिक्षक सुदर्शन घुले,विठोबा मुळे व आदि शिक्षक व गावातील व्यक्ती यांच्या कडून वरील सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.