५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेचे आयोजन
नाशिक ( २५ जून ) :- साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात नवोदित प्रतिभांना वाव देण्यासाठी नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांनी एका अभिनव स्पर्धांचे आयोजन केले आहे . इयत्ता पाचवी ते दहावी ते विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत निबंध लेखन आणि काव्य गायन या दोन स्पर्धांचा समावेश असून म्हणजे त्यांना मानाची पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमधील अंतर्निहित कलागुणांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्या प्रतिभेला एक सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. निबंध लेखन स्पर्धेसाठी निवडलेले विषय हे सदरील प्रमाणे असणार आहेत :
1. छत्रपती शिवाजी महाराज: स्वराज्याचे संस्थापक
2. माझी जिद्द व यशाची गळाभेट!
3. अर्धवट शिक्षण, बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी.
4. पर्यावरण संरक्षण: काळाची गरज
5. भारतीय संस्कृती आणि परंपरा: बदलत्या काळात त्यांचे महत्त्व
सदरील पाच विषय आहेत.
काव्य गायन स्पर्धेत एक नाविन्यपूर्ण घटक म्हणजे वैयक्तिक सादरीकरण बरोबर सामूहिक काव्यगायनाचाही समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगीक कार्य आणि परस्पर सुसंवादांचे कौशल्य आत्मसात करण्याची दुर्मिळ सुद्धा लाभणार आहे. वैयक्तिक सादरीकरणासाठी तीन ते पाच मिनिटे तर सामूहिक सादरीकरणासाठी पाच मिनिटांचा सुयोग्य मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ( निबंधलेखन व काव्य गायन करीता ) :-
प्रथम क्रमांक :- पदक + मेडल + प्रमाणपत्र
द्वितीय व तृतीय क्रमांक:- पदक + मेडल + प्रमाणपत्र
तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मेडल+ प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेचे आयोजक प्रसाद भालेकर यांनी या स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “ या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत. सामूहिक काव्यगायनातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना आणि नेतृत्वगुणांचा विकास होईल, अशी आमची अपेक्षा आहे.
सदरील स्पर्धा हि ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून विद्यार्थ्यांना निबंधलेखनाचे फोटो तसेच काव्य गायनाचे व्हिडिओ हे ९५२९१९५६८८ ह्या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेल आयडी jivankeshrimarathi@gmail.com यावर पाठवावे लागणार आहे. अंतिम मुदत हि १० जुलै २०२४ पर्यंतची असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५०/- प्रति विद्यार्थी असे प्रवेश शुल्क असणार आहे. तरी नाशिकमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सदरील निबंधलेखन स्पर्धेत तसेच काव्य गायन ( वैयक्तिक/ सामूहिक) स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे तसेच काव्य गायन स्पर्धेत शाळेतर्फे सुध्दा शाळेतील गीतमंच स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
निबंधलेखन स्पर्धेचे नियम व अटी:
१. निबंध मराठी भाषेत असावा.
२. शब्दमर्यादा: किमान ३०० ते कमाल ५०० शब्द.
३. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा.
४. निबंधाचा विषय वरील पाच विषयांपैकी एक असावा.
५. मूळ आणि सृजनशील लेखनाला प्राधान्य दिले जाईल.
६. निबंधाच्या शेवटी विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा.
७. निबंधाचे स्पष्ट व सुवाच्य फोटो काढून पाठवावेत.
८. एका विद्यार्थ्याने केवळ एकच निबंध पाठवावा.
काव्य गायन स्पर्धेचे नियम व अटी:
१. कविता मराठी भाषेतील असावी.
२. गायनाची कालमर्यादा: ३ ते ५ मिनिटे.
३. कवितेचे शीर्षक आणि कवीचे नाव सादरीकरणाच्या सुरुवातीस सांगावे.
४. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्टपणे दिसावा.
५. पार्श्वसंगीत वापरण्याची परवानगी आहे, परंतु ते गायनाला बाधा आणणारे नसावे.
६. व्हिडिओच्या सुरुवातीस विद्यार्थ्याने स्वतःची ओळख (नाव, वर्ग, शाळा) द्यावी.
७. एका विद्यार्थ्याने किंवा समूहाने केवळ एकच सादरीकरण पाठवावे.
विशेष सूचना:
- काव्य गायन स्पर्धेत शाळेतर्फे समूहाद्वारे सुद्धा सहभागी होता येईल.
- समूह सहभागासाठी बक्षीस व प्रवेश शुल्क संपूर्ण समूहाकरिता एकच असेल.
- सर्व सादरीकरणे मौलिक असावीत. कॉपीराइट उल्लंघन टाळावे.
अधिक माहितीसाठी वरील संपर्क क्रमांक प्रसाद भालेकर ९५२९१९५६८८ किंवा ईमेल jivankeshrimarathi@gmail.com वर संपर्क साधावा.
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
stay connected