खालापूरी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीन वंजारे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमानी साजरा झाला

 खालापूरी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीन वंजारे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमानी साजरा झाला




      बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालापूरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. उन्हाळ्यामध्ये दिवसेंदिवस ग्लोबल वार्मिंग वाढत असल्या कारणाने व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून खालापूर मध्ये वृक्षरोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर गोरगरीब रस्त्यावरील लोकांना अन्नदान ही करण्यात आले. आपला वाढदिवस लोकांच्या हिताचा ठरावा हे ब्रीद लक्षात ठेवून प्रत्येक वर्षी डॉ वंजारे हे त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करतात.वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या क्लिनिक मध्ये मोफत डोळे तपासणी शिबिर ठेवले होते .त्याच बरोबर अनाथ आश्रमाला अन्नदान करून अनाथांचा नाथ होण्याचे भाग्यही प्राप्त केले.स्वतःचा प्रपंच संसार आणि व्याप यातून वेगळं जाऊन समाजहित जपल गेलं पाहिजे आपण लोकांच्या कायम कामाला आल पाहिजे हीच भावना डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर नेहमी जपत असतात आणि याच भूमिकेतून दिवसेंदिवस त्यांची सामाजिक ओळख निर्माण होत असून सामाजिक कार्यतत्परता आणि कार्यसम्राट असणाऱ्या ह्या राजकीय वारसा नसणाऱ्या शेतकरी कष्टकरी पुत्राला आज ना उद्या राजकीय क्षेत्रातही यश मिळेल यात शंका नाही.राजकारणात उच्च सुशिक्षित लोकांची भर पडली पाहिजे त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश लोकांपर्यत गेला पाहिजे.धर्मवाद, प्रांतवाद,जातीयवाद,भाषावाद दूर करून आपण एकरूप समतावादी सार्वभौम राष्ट्र निर्मितीसाठी सुशिक्षित लोकांना राजकीय धुरा दिली गेली पाहिजे विकास हा तळागाळापर्यंत पोहचला पाहिजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे,देशातील लोकशाही मजबूत झाली पाहिजे संविधान जिवंत ठेवून कायदा हक्क अधिकार कायम जिवंत ठेवले पाहिजे आणि कृषिप्रधान देशात शेतकरी सुखी झाला पाहिजे असे कणखर पक्के विचार असणाऱ्या डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांना वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून शुभेच्छाचां वर्षाव होत आहे .युवक,विद्यार्थी,शेतकरी, कष्टकरी,दीन दलीत, शोषीत, पिडीत,आदिवासी,शेती, कामगार,कर्मचारी वर्गासाठी विशेष काम करणाऱ्या डॉ जितीनदादा वंजारे यांना गोरगरीब जनतेचे शुभाशीर्वाद मिळत असून त्यांची लोप्रियता दिवसेंदिवस परिसरात वाढत आहे.

           टाकळी मानूर येथेही त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वैद्यकिय आणि सामाजिक सेवेतून मोठी ओळख निर्माण करून लोकांच्या हितासाठी हक्क अधिकार आणि जुलामा विरुद्ध जाहीर बंड पुकारून शासन दरबारी कायद्यान्वये गरिबांची बाजू घेणाऱ्या अन्याय विरुद्ध लढणाऱ्या आणि आपल्या लेखणीतून सडेतोड खर सत्य आणि निर्भिड लेखन करणाऱ्या ह्या अवलियास वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा देण्यासाठी खालापूरी गावातील असंख्य तरुण,वयोवृद्ध,मार्गदर्शक, आप्तेष्ट,मित्रगण,अबालथोर उपस्थित होते यावेळी तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवसेना नेते रशीदमामु शेख,शिवसंग्राम नेते कृष्णा परजने,एन सी पी नेते किरण भागवत परजणे,ग्राम सदस्य सुरेशभाऊ परजने, मनसे नेते सचिन परजने,सैनिक नितीन वंजारे,हभप उद्धव नाना काळे, वक्रंगी चे राधाअण्णा परजने,शिक्षण समितीचे विनायक गवळी, वंचित चे अक्षय लोंढे,संजय लोंढे, हभप भारती महाराज,उद्योजक अप्पादादा उगले,महादेव परजने,युसुफ पठाण,सावता डोके,संजय उगले, बालू परजने,विलास परजने, रा.प.मंडळाचे अर्जुन डोके,मराठा समन्वय धनंजय परजने,राजू काळे,बाळासाहेब परजने,चंदू खरपाडे, ज्ञानेश्र्वर परजने,गणेश परजने,राजेंद्र परजने,निलेश परजने,बाबू परजने,बळीराम परजने, गुड्डू परजने,कृष्णा खरपाडे,कृष्णा उगले,सचिन डोके,सचिन वंजारे, इंजी.संजय महाकुडे,गणेश उगले,इत्यादीसह अनेकजण उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.