कृषीरत्न बाबासाहेब पिसोरे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली चुंभळीत उद्या कांदा शेती कार्यशाळा
बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने असुन कांद्याचे उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल असतो . मात्र कांदा पिक व्यवस्थापन व कांदा पिकाचे अर्थकारण समजून घेण्यासाठी चुंभळी येथे कांदा शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) व अॅक्सिस बँक
फाउंडेशन सहकार्याने शाश्वत उपजिविका प्रकल्पा अंतर्गत कांदा शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती मा.श्री. नाथराव शिंदे साहेब ( तालुका कृषी अधिकारी ) यांची असणार आहे तसेच यावेळी
कांदा पिकातील तज्ञ व सोना 40 या कांदा बियांनाचे पैदास्कार कृषिभूषण, कृषिरत्न पुरस्कार विजेते मा.श्री.बाबासाहेब पिसोरे अण्णा यांचे मार्गदर्शन होणार आहे . ही कार्यशाळा -हनुमान मंदिर चुंबळी, ता. पाटोदा येथे दिनांक:-03/06/2024 सोमवार रोजी सकाळी 10:00 वाजता होणार असुन परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
stay connected