आष्टी विधानसभेसाठी जनतेला हवा नवीन चेहरा
आष्टी ( प्रतिनिधी )
विधानसभेचा आष्टी मतदार संघ तीन तालुक्याचा मिळून बनलेला आहे. त्यामध्ये आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्याचा काही भाग येतो. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या ताईंना या मतदारसंघाने सुमारे 32 हजार मतांचे मताधिक्य दिले. यावेळी ताईच्या बाजूने सर्व प्रस्थापित म्हणजे माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार बाळासाहेब आजबे, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस व अनेक लहान मोठे सत्ताधारी कार्यकर्ते होते. नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बाजूने प्रस्थापिता पैकी माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना हे एकमेव होते. परंतु जनता मात्र पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होती.
ताईंना मताधिक्य मिळाले असले तरी त्यामध्ये वाटेकरी अनेक जण आहेत . विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे सर्वजण आपापल्या मार्गाने जाणार आहेत? अर्थात ते आपली वेगवेगळी चूल मांडणार आहेत. त्यामुळे या प्रस्थापितांना जनता पुन्हा संधी देणार नाही असे चित्र आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाचे आहे. असे प्रहार वारकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ह भ प विठ्ठल महाराज गुंड यांनी आमचे प्रतिनिधी जवळ व्यक्त केले. इच्छुक कोण कोण आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की,आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे सामाजिक काम व आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर यामुळे आष्टी विधानसभेसाठी अनेक नवीन चेहरे इच्छुक झालेले आहेत. त्यामध्ये इंजिनियर तानाजी बापू जंजिरे, सरपंच सागर आमले, ॲड नरसिंग जाधव, शिवनाथ पवार (फौजी), ॲड. प्रदीप चव्हाण , शिवाजी सुरवसे आदी नवीन चेहरे आहेत.
stay connected