माजी शिक्षण सभापती उद्धव बापु दरेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्या आयोजन
कडा / अनिस मोमिन
जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांचे जेष्ठ चिरंजीव माजी शिक्षण सभापती उद्धव बापू दरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्यदिव्य अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन मोरया मंगल कार्यालय सुलेमान देवळा येथे करण्यात आले आहे
याविषयी माहिती अशी की,गरिबांचे कैवारी,आबालवृद्धचे आधारस्तंभ , समाजसेवक असे अनेक उपादी दिल्या तरी ज्यांच्यासाठी कमीच आहेत असे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उद्धव (बाप्पू ) दरेकर यांनी आपल्या नेतृत्व, कर्तृत्वाच्या वक्तृत्व या त्रिवेणी संगमाच्या जोरावर आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करून राजकारणात आपला एक दबदबा निर्माण केला आहे आष्टी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत जनमानसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून प्रत्येकाच्या सुखादुःखात नेहमी आधार देत आहेत उद्धव (बाप्पू ) दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे येथे २६ जूनला भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे.या सोहळ्यासाठी नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,आमदार संदिप क्षीरसागर, आमदार रोहित दादा पवार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा नेते जयदत्त भैय्या धस उ.बा.ठा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, या अभिष्टचिंतन सोहळ्यास तालुक्यांमधील तमाम जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्धव बाप्पू दरेकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
stay connected