अहमदनगर शहरात जातीयतेढ वाढीस व दंगलीच्या प्रयत्नास बजरंग दल जबाबदार

 अहमदनगर शहरात जातीयतेढ वाढीस व दंगलीच्या प्रयत्नास बजरंग दल जबाबदार

एम आय एम ची कारवाईची मागणी 



अहमदनगर - पोलीस प्रशासनाने बेकरी हल्ला घटनेत ३ आरोपी पकडल्याचे प्रसिद्धी माध्यमामार्फत समजले. अहमदनगर शहरात झालेल्या दगड फेक आणि पाईप लाईन रोड येथील बेकरीत निष्पाप व्यक्तींवर झालेला भ्याड हल्ला याचे सूत्र जुडलेले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. 

जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की ज्यावेळेस पोलिसांनी तोफखाना येथील प्रकरणात बजरंग दलच्या पदाधीकारींना ताब्यात घेतले व न्यायालय समोर हजर केले त्याच वेळेस पाईप लाईन रोड बेकरी प्रकरणात चौकशी कामी ताब्यात घेणे गरजेचे होते. परंतु येथे पोलिसांनी तत्परता दाखवली नसल्याने दुसरया प्रकरणात ताब्यात घेण्या आगोदरच ती व्यक्ती न्यायालयातून फरार झाले. याचा अर्थ असा निघतो की या जातीवादी संघटनेच्या लोकांना निसटण्यासाठी कुठे न कुठे प्रशासन जबाबदार आहे. अशी शंका डॉ परवेज अशरफी यांनी व्यक्त केली.व यांनी मागणी केली आहे की अहमदनगर शहरात जे घडले याची सखोल चौकशी होणे गरजेचे असून अहमदनगर चे वातावरण खराब करण्यात कोणकोणती राजकीय व्यक्ती, प्रशासनातील पदाधिकारी यांचा सहभाग आहे हे जनते समोर येणे खूप गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल आणि झालेल्या संभाषण याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या आरोपींची कसून चौकशी केली तर अहमदनगर मध्ये दंगल कोण घडवण्याचा प्रयत्न करीत आहे? बजरंग दल सारख्या जातीवादी संघटनेला कोण पाठबळ देत आहे ? यात कोण कोणते राजकीय पुढारी व कोणत्या पक्षाचे पुढाकार घेत आहे ? यांना जातीवादी संघटनेला सरकारी खात्यातून कोण मदत करत आहे? सरकारी खात्यात कोणते वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी बजरंग दल सारख्या जातीवादी संघटनेसाठी काम करत आहे? याचा खुलासा जनते समोर येईल. ज्यामुळे अहमदनगर , महाराष्ट्रात,आणि देशात दंगल घडून त्याचा फायदा कोणता राजकीय पक्ष घेत आहे? हे जनते समोर येईल. त्यासाठी दिनांक १८.०६.२०२४ रोजी अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करणे व बजरंग दल सारख्या जातीवादी संघटनेला मदत करणारे मास्टरमाइंड सूत्रधार या सर्वांचे चहेरे जनते समोर उघड करणे आजची गरज आहे. असे नमूद केले आहे.  

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री,गृह मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, खासदार असदुद्दीन ओवेसी, प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांना पाठविण्यात आली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.