ई केवायसी साठी तलाठी अंकिता जाधव यांचा उपक्रम रुग्णांच्या घरी जाऊन राबवितात उपक्रम
आष्टी प्रतिनिधी - अनुदानापासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना अनुदान मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द सज्जाचे तलाठी अंकिता जाधव यांनी या सज्जा अंतर्गत येणाऱ्या शिरापुर, पिंपळगाव दाणी व कानडी खुर्द या गावातील काही शेतकऱ्यांचे ई केवायसी चे काम अपूर्ण होते. तलाठी अंकिता जाधव यांनी ९०% ई केवायसी चे काम पूर्ण केले असून अजून सदरील काम जोमाने सुरू आहे. गावातील लाभार्थी, गावचे सरपंच, सीएससी सेंटर व ऑपरेटर यांच्याशीही स्वतः संपर्क साधून अनुदानापासून कोणत्याही लाभार्थ्यांनी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले आहे. या आधी ही शासनाचे विविध उपक्रम योगिता जाधव यांनी यशस्वी पणे राबविलेले आहेत. सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावात काही शेतकरी अपंग, वृध्द तसेच आजारी आहेत. अशा व्यक्तींची माहिती घेत तलाठी अंकिता जाधव यांनी त्यांच्या घरी जाऊन त्या लाभार्थ्यांची ई केवायसी करून घेतली आहे.
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी अनुदान प्राप्त करुन घेण्यासाठी खातेदारांनी लवकरात लवकर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई केवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected