श्री क्षेत्र महादेव दरा ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे ७ जुलै ला प्रस्थान

 श्री क्षेत्र महादेव दरा ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे ७ जुलै ला प्रस्थान

                                                                                           


                      

आष्टी ( प्रतिनिधी)    विकास साळवे -


  आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर महादेव दरा संस्थान ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान क्षेत्र विकासक ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी होणार आहे.

श्री क्षेत्र महादेवदरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचा बीडसांगवी ,देसुर, चिंचाळा,जामगाव , अरणगाव,कवडगाव, चौंडी,चापडगाव ,जातेगाव,कामोणे फाटा, करमाळा,देवळाली, कुंभेज फाटा,शेलागाव चौक, आदिनाथ कारखाना ,पांगरे,कंदर, कन्हेरगाव ,वेणेगाव, टेंभुर्णी,दगड अकोला, परिते,करकंब,भोसे, कोकनदी होळे,विठ्ठल सहकारी साखर कारखाना ते पंढरपूर    असा प्रवास मार्ग आहे.        रविवार दि.७ जुलै २०२४ सकाळी ८ वा.पायी पालखी प्रस्थान होईल. सर्व भक्तांनी आपले जीवन कृतार्थ करण्यासाठी महादेवाच्या पालखी सोहळ्याबरोबर अवश्य यावे असे आवाहन ह.भ.प. क्षेत्र विकासक कल्याण महाराज कोल्हे व समस्त ग्रामस्थ बीडसांगवी आणि महादेव मंदिर ट्रस्ट, महादेवदरा यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.