बी- बियाणे,खतांची निर्धारित दरापेक्षा जादा दराने विक्री करू नये --आ.सुरेश धस
**********************************
**********************************
आष्टी (प्रतिनिधी)
जूनच्या पहिल्याच आठवड्यात वरूण राजाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून उघडीप मिळाल्यावर खरीप हंगामाचे काम सुरू करणार आहे.लगेच तालुक्यातील शेतकरी वर्ग पेरणीच्या लगबगीला लागणार असून पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे आणि खतांसाठी मागणी वाढणार आहे.याचा गैरफायदा काही बी- बियाणे आणि खत विक्री करणारे विक्रेते घेतात आणि सरकारच्या निर्धारित दरापेक्षा जादा दराने विक्री करतात असे प्रकार होऊ नयेत शेतकऱ्यांना चढ्या भावाने बी-बियाणे,खते विक्री करू नये असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे आ.धस म्हणतात की,सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने पेरणी बी,बियाणे अथवा खतांची विक्री करत असल्यास एखादी कंपनी अथवा कृषी सेवा केंद्र वाढीव दरात खत विकत असल्यास त्याची माहिती आष्टी तहसील कार्यालय किंवा आष्टी तालुका कृषी कार्यालयात नेमणूक केलेल्या अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी.तसेच बी-बियाणे, खते विक्री करणाऱ्या दुकानदारांनी चढ्या भावाने विक्री न करता राज्य सरकारने निर्धारित केलेल्या नियमांचे सर्व विक्रेत्यांनी पालन करावे.गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असून चढ्या भावाने बी -बियाणे खते घेतल्याने आर्थिक संकटाचा बोजा शेतकऱ्यांना लादला जाऊ शकतो त्यामुळे असे न करता सर्व विक्रेत्यांना विनंती आहे की, शेतकऱ्यांची लूटमार न करता योग्य भावातच बी-बियाणे खते द्यावेत अशी विनंती आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
******************
दूध उत्पादक शेतकऱ्यांनो मकाच्या पीक पेरणी व उत्पादनाकडे भर द्या
----आ. सुरेश धस
आष्टी तालुक्यासह मतदारसंघात दूध उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात असल्याने तसेच दूध उत्पादकांना आगामी काळात चारा टंचाई भासू नये म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मकेच्या पीक पेरणी व उत्पादनाकडे भर द्यावा आणि मुरघास करावा यातून चारा टंचाई व दूध उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न होईल. शेतकऱ्यांनी मका पीकाचे पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवावे असेही आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
stay connected