दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप वाळकी च्या वतीने श्री शरद गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा
दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप वाळकी च्या वतीने श्री शरद गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा व समीना तांबोळी यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.दि. २३/०६/२०२४ रोजी हॉटेल सागर (नेते) केडगाव, अहमदनगर येथे सेवा निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राम भालसिंग यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी सुभाष भालसिंग (अहमदनगर पोलिस) व संचालक एम.पी.एम.सी., लोहगाव, पुणे यांनी सुत्र संचालन केले. यावेळी सुनील कोठुळे सरपंच खडकी, बाजीराव कासार ,शरद गायकवाड , समीना तांबोळी, जुबेदा पठाण यांनी मार्गदर्शन पर भाषणे केली.भारती गायकवाड यांनी स्तवन गित म्हटले.कार्यक्रमाला राम भालसिंग, सुभाष चं. भालसिंग, सुनील कोठुळे, सुनील शिंदे, बाजीराव कासार, मुन्ना पठाण,जुबेदा पठाण, विजया म्हस्के, कांता काटकर, नंदा ढगे, मकरंद नाईक, शाम घोडके असे हजर होते.
stay connected