सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे उत्साहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.
पुणे:- आज बुधवार दिनांक २६ जुन २४ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे उत्साहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी झाली.इयत्ता सहावीच्या वर्गाकडे कार्यक्रम होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे संस्थापक माननीय श्री.गोविंद दाभाडे सर यांनी स्वीकारले.प्राचार्या सौ.वाळुंज मॅडम,उप प्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षिका सौ.घावटे मॅडम व सौ.गुरव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रतिमा काळे मॅडम यांच्या वर्गातील कुमारी मीरा मगर हिने तर सूत्र संचलन शिवम कांबळे याने केले.विघ्नेश सोळसे याने सुंदर,बहारदार भाषण केले.तसेच वैभव नेटके,श्रद्धा उघडे,आरोही कांबळे यांनीही भाषणे केली.तर शाळेतील शिक्षिका सौ.चौधरी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तर सौ.गुरव मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार सौ.भालेराव मॅडम यांनी मानले,कार्यक्रमाची सांगता झाली.जयंती निमित्ताने ६ वी अ वर्गात चित्रकला स्पर्धा सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी घेतली.१२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.१) राजरत्न कांबळे :-प्रथम क्रमांक, २) श्रेयस तांबे :- द्वितीय क्रमांक,३) मीरा मगर :- तृतीय क्रमांक,४) साई माळे :- चतुर्थ क्रमांक,५) शिवम कांबळे :- पंचम क्रमांक तसेच ६)संस्कार मेनकर :- सहभाग,७) आराध्या पवार :- सहभाग,८)दिपल पाटील :- सहभाग,९) मधूकुमारी निर्मलकर :- सहभाग,१०)संस्कृती भूरुक :- सहभाग,११) धनश्री पाचारे :- सहभाग,१२) अंजली जगताप :- सहभाग.सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थापक, प्राचार्या,उप प्राचार्य,पर्यवेक्षिका,पालक व वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या व भरभरून कौतुक केले.
stay connected