मुंबईत पत्रकार अविनाश कदम यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित
मुंबई। प्रतिनिधी
मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने रविवार दि २३ जून २०२४ रोजी आपण करीत असलेल्या राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी, (पत्रकारिता) या क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आपणांस महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार - २०२४ आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा लोकमत व मराठवाडा साथी दैनिकाचे आष्टी तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव व सिने अभिनेत्री स्मिताताई भोसले/धुमाळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, उद्योजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सगिताताई गुरूव, जिजाऊ ब्रिगेडच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा तथा जिजाऊ व्याख्यात्या अनिताताई काळे, देवानंद कांबळे, सेवा निवृत्त कर्नल जी पी लढ्ढा, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
stay connected