उदयनराजे भोसले यांनी केली जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी

 उदयनराजे भोसले यांनी केली जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी



राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी केली आहे. मी जात पात मनात नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी  23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी  असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली. 

लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण हिंसा, गावबंदी करणे चुकीचे आहे, परंतु असे केल्याने उपोषणकर्त्यांचा आंदोलकणाच्या विरोधात जनमत जात असते. हे सरकार आंदोलन पेटवत आहे, मराठयांनी ओबीसी विरोधात आणि ओबीसींना मराठ्याविरोधात आंदोलन केले पाहिजे असे सरकारलाच वाटते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 




फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रमध्ये असा जातीयवाद होणे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे. जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी भूमिका घेताना राजकीय विद्वेष होऊ नये, याची भूमिका घेणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने भूमिका घ्यायचे तशी भूमिका पंकजा मुंडे घेतात का हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले भोगायला भेटले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.