CHIKHALI | स्प्रिंकलरच्या तोट्यांसह 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणारे अखेर चिखली पोलिसांच्या ताब्यात
चिखली : शेतात सिंचनासाठी लागणार्या स्प्रिंकलरच्या तोट्या घेऊन जात असलेल्या माहितीवरून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात डि. बी. पथकाने कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असून राकेश पवार, कन्हैया पवार, भास्कर पवार, रवींद्र पवार आणि ज्योती पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चिखली पोलिसांनी त्यांच्याकडून 106 तोट्या, काही भंगारचे तुकडे आणि 4 दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने केली आहे.
stay connected