श्रीनिवास बोनगिरवार यांच्या मालकीची मोटारपंप व पाईप लंपास
पैनगंगा नदीपात्रातून साडेसात एचपीची मोटारपंप स्वाहा
सुनील शिरपुरे/झरीजामणी
झरीजामणी तालुक्यातील कमळवेल्ली येथील सामान्य शेतकरी श्रीनिवास श्रीराम बोनगिरवार यांची ७.५ एचपीची मोटारपंप व १० पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांच्या शेतात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. त्या भाजापाल्याला पाणी देण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात ७.५ एचपीची मोटारपंप बसविण्यात आले. नेहमीप्रमाणे दि.३०/०५/२०२४ रोजी ते भाजीपाल्याला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना मोटारपंप व १० पाईप दिसून आले नाही. प्राथमिक चौकशी अंतर्गत इकडे-तिकडे शोधाशोध केल्यानंतर कुठेच आढळून न आल्याने मोटारपंप व पाईप असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे सिद्ध होताच दि.०२/०६/२०२४ रोजी पाटण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. त्यानंर निवडणुकीचा निकाल असल्याने दि.०६/०६/२०२४ रोजी बिट जमादार व इतर पोलीस कर्मचारी पंचनाम्यासाठी आले. त्यानंतर मात्र काय चौकशी झाली आणि काय सुगावा लागला? या गोष्टींचा कोणताही बोध लागलेला नाही. त्यामुळे पोलीस विभागाकडून कसून चोकशी करण्यात येऊन सदर चोरट्यांचे मुसके आवळण्यात यावी. अन्यथा हे चोरीचे सत्र असेच सुरू राहील यात काही शंका नाही. जर हे असंच सुरु राहिलं तर जनतेच्या संरक्षणार्थ असलेल्या पोलीस कर्मचा-यांवरील जनतेचा असलेला विश्वास आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. शिवाय त्यांच्याप्रती असलेला मानसन्मान देखील कमी होईल. सध्या पेरणी व लावणीचा हंगाम असल्याने सामान्य शेतक-यांचे इतर शेतीपयोगी साहित्य चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून चोरट्यांना बेड्या ठोकावे आणि सदर शेतक-याला न्याय मिळवून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
stay connected