DHULE | शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गजाआड करण्यात यश; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे / तेजवार्ता न्यूज- शिरपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी दोघांना गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे ८५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात २४ जून रोजी रात्रीची गस्त घालत असताना निमझरी नाका परिसरात दोन दुचाकीवर पाच जण संशयास्पद फिरत असताना दिसून आले.त्याठिकाणी असलेले उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी शोध पथकास बोलावून शोध घेण्याचा प्रयत्न केला.बाजार समितीच्या पुढे रस्त्यावर होंडा शाईन गाडीवर बसलेल्या तिघांपैकी एकाच्या हातात बॅग दिसल्याने त्यास पकडत असताना अन्य एक पळून गेला.मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेंद्र सिंह उर्फ राजन प्रीतम सिंग बरनाला (२६),ईश्वर सिंग नुरबिन सिंग चावला(२३,रा. उमरटी,ता.वरला,जि.बडवाणी)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.फरार झालेल्या संशयित शेरसिंग निर्मल सिंग जूनेजा व इतर दोन असे तिघे फरार झाले आहेत.पोलिसांनी शाईन गाडी,स्टील तलवार,स्क्रू ड्रायव्हर,लोखंडी टॉमी,पोपट पाना, बॅग,मिरची पावडर, सूती दोरी असे एकूण ८५ हजार १०० रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कांतीलाल पाटील,उपनिरीक्षक हेमंत खैरनार,संदीप दरवडे,शोध पथकाचे हवालदार ललित पाटील,उदय पवार,रवींद्र आखड मल,विनोद अखडमल,योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार,सुदर्शन मोरे, भटू साळुंके, आरिफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन, मनोज दाभाडे,चालक रवींद्र महाले,नासीर पठाण यांनी केली आहे.
stay connected