DOMBIVALI | पिकप टेम्पो चालक आणि क्लीनरची मस्ती Zomato बॉयच्या जीवावर बेतली; आठ गाड्यांचे नुकसान

 DOMBIVALI | पिकप टेम्पो चालक आणि क्लीनरची मस्ती Zomato बॉयच्या जीवावर बेतली; आठ गाड्यांचे नुकसान




 डोंबिवलीत खोणी पलावा या हाय प्रोफाईल परिसरात पिकअप टेम्पो गाडी क्लीनर चालवत होता. त्याला गाडी चालवता येत नव्हती. या भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभा असलेल्या झोमॅटो कर्मचारीला  जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या झोमॅटो  कर्मचारी काही अंतरापर्यंत फरफडत नेले. या अपघातात या झोमॅटो बॉय चा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या क्लीनर याला अटक केली आहे . गाडीचा मालक कोण आहे? गाडी का क्लीनरला चालवायला दिली या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत मात्र हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे. गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणारया पाण्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो चालकाने टेम्पो आपल्या क्लिनरला चालवायला दिला . क्लीनर जवळ लायसन्स नव्हतं त्यानंतरही त्याला गाडी चालवण्याचा दिली . क्लिनर टेम्पो भरधाव वेगाने चालवत असताना  त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका झोमेटो कर्मचार्याला जोरदार धडक दिली . दरम्यान हा झोमॅटो बॉय रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पार्सल गाडीला बांधत होता.याच दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव पीकअप टेम्पोने त्याला धडक दिली .या धडकेत या झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यत फरफटत गेला .या अपघातात या झोमेटो बॉयचा मृत्यू झाला .सौरभ यादव असे या मयत तरुणाचं नाव आहे.इतकेच नाही टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या आठ दुचक्याना टेम्पोने धडक दिली  .या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता .घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत टेम्पोचा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतलं  .जमवाची समजूत काढली . पिकप टेम्पो चालकाने हा क्लिनरला चालवायला दिल्याने हा अपघात घडला .मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे क्लीनर् सह  टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोचा क्लिनर आतीश जाधव याला अटक केली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी हा टेम्पो कोणाचा होता टेम्पो चालकाने क्लीनरला गाडी चालवायला का दिली? याचा तपास सुरू केला आहे. लायसन्स रस्त्याला देखील क्लीनरला गाडी चालवायला दिल्याने टेम्पो मालक व टेम्पो चालक यांच्यावर देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.