JALNA | सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप

 

JALNA | सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप





माझं कठोर आमरण उपोषण सुरु आहे. एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेवू अशी चर्चा सरकारकडून सुरु आहे. मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे. असा अंदाज दिसतो असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरु आहे जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॅाक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतला आहे. 



JALNA | मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली ; उपचार घेण्यास जरांगे यांचा नकार 


- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करत आहेत. जरांगे पाटील यांचा बीपी कमी झालाय तर शरिरातील पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.