KALYAN | मेट्रोचे काम सुरू करण्याआधी पर्यायी रस्ते तयार करा अन्यथा रास्तारोको आंदोलन करणार - राजू पाटील
कल्याण (प्रतिनिधी ) - मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कल्याण तळोजा मेट्रो आली. त्याचे काम सुरु केले आहे. हे काम सरु करण्यापूर्वी कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा अशी आमची मागणी आहे. हे पर्याची रस्ते तयार नसल्याने आज शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात रुग्णवाहिका अडकून पडतात. कल्याण शीळ रस्त्यावर सुरु असलेल्या कल्याण तळोेजा मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी, रुग्णांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास होतोय. या कामाला माझा विराेध नाही. परंतू आधी पर्याची रस्ते करा नंतर हे काम सुरु करा. नाही तर सात दिवसात रास्ता रोको करणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे. आज पुन्हा डोंबिवलीतील कंपनीला आग लागली. तेव्हा त्याठिकाणी्ता अग्नीशमनच्या गाड्या जाताना त्रास होतोय.यठिकाणी मेट्रोचा कल्याण शीळचा भाग कमी आहे. हे काम तळोजापासून सुरु करायला हवे होते. त्या दरम्यान कल्याण शीळ मार्गावरील पर्याची रस्ते तयार करायला हवे हवेत. हे काम केले नाही तर रास्ता रोको करुन मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा दिला आहे. डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदा राजू पाटील यांनी सरकारवर सडेताेड टिका केली आहे. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत. कंपन्या हटवू शकतील की नाही या बाबत मी साशंक झालोय आत्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डोेंबिवलीतील कंपन्यात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहे. अमूदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर त्यांनी सरकारवर हे टिकास्त्र सोडले आहे.आज डोंबिवली पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने या भागातील पाणी आणि रस्ते समस्यावर आमदार पाटील यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार पाटील हे हजर होते. त्यांनी सांगितले की, या समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढून असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
stay connected