KALYAN | भाजपचे कोणतेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग तो म्हणजे भाजप बाजूला करण्याचा; रमेश कीर यांचा भाजपला टोला
कल्याण (प्रतिनिधी ) - महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे हीच आमची मोर्चे बांधणी आहे ,भाजपचे कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे तो म्हणजे या लोकांना बाजूला करण्याचं आणि ते निश्चित पणाने या वेळेला या मतदारसंघात करून दाखवु असा टोला कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी भाजपला लगावला. कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे प्रचाराच्या निमित्ताने कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आले होते. यावेळी बैठकीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रमेश किर यांनी आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकतीने लढू व जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी ही निवडणूक पदवीधरांचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लढवली जाणार आहे तसेच शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी आम्ही आग्रही असणार आहोत . पदवीधरांचे प्रश्न जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक उद्योग आहेत तिथे स्थानिकांना प्राधान्य देणे त्याचप्रमाणे यूपीएससी एमपीएससी जिल्हा निहाय सेंटर सक्षम करणे ,कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध कशी करून देता येईल यासाठी प्रयत्न करणे या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्याचे सांगितले आहे.
stay connected