Loksabha Election Live Updates 2024 : Results
गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राज्यात सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मसाठी सज्ज झाले असून त्यांना रोखण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडीचे काय होणार याचा फैसला आज होणार आहे. निकालाच्या आधी विविध एक्झिट पोलमध्ये भाजप विजयाची हॅटट्रिक करणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात निकाल काय लागतो याची उत्सुकता फक्त देशातील नागरिकांना नाही तर जगातील अन्य देशांना देखील आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या उत्सवात कोणाचा विजय होतो हे पुढील काही तासांत समोर येईल. तेजवार्ता च्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या क्षणाक्षणाचे लाइव्ह अपडेट जाणून घ्या
*४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी*
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग (बप्पा ) सोनवणे– शरद पवार गट (आघाडीवर)
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
Big Breaking : पंकजा मुंडेंची फेरमतमोजणी ची मागणी
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
बत्तीसाव्या फेरी अखेर 3145मतांनी बजरंग सोनवणे आघाडीवर
२३ व्या फेरीत ३४७०५ मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर
21 व्या फेरीत पंकजा मुंडे 33600 मतांनी आघाडी वर
फेरी क्रमांक -20
पंकजा मुंडे-490148
बजरंग सोनवणे-473666
आघाडी - 16482 (पंकजा मुंडे)
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक -18
पंकजा मुंडे-444455
बजरंग सोनवणे-420356
आघाडी -24099 (पंकजा मुंडे)
--------------------------
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक -17
पंकजा मुंडे- 413213
बजरंग सोनवणे-401869
आघाडी - 11344 (पंकजा मुंडे)
--------------------------
सोळाव्या फेरीत पंकजाताई १२००० मतांनी आघाडी वर
--
बाराव्या फेरी अखेर बजरंग बप्पांना 1644 मतांची लिड
*10 वी फेरी 11955 पंकजा मुंडे आघाडी*
९ व्या फेरीत 10244 मतांनी पंकजाताई आघाडीवर
◾ *बीड लोकसभा निवडणुक 2024*
🛑 *तेजवार्ता अपडेट्स* 🛑
*फेरी क्रमांक - 8*
*पंकजा मुंडे-193922*
*बजरंग सोनवणे-184556*
*आघाडी - 9366 (पंकजा मुंडे)*
➖➖➖➖➖➖
*सातवी फेरी*
पंकजा मुंडे -165006
बजरंग सोनवणे- 165209
लीड - 203
---------
मुंबईत 6 जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या
उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा धक्का आहे.
उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे 49 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत.
उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत.
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.
उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत
सुजय विखे 800 मतांनी पुढे 6 वी फेरी
सुप्रिया सुळे 11532 मतांनी आघाडी
बारामतीचा सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच रंगला होता. मात्र महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी विरुद्ध मोदी असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा फॉर्म्युला चालला नाही. सहाही विधानसभा मतदारसंघात सु्प्रिया सुळे आघाडीवर आहे. बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे आघाडी आहे. सुप्रिया सुळे 11532 मतांनी आघाडी घेतली आहे.
अहमदनगर अपडेटेड
फेरी क्रमांक- 5
सुजय दादा विखे- 12353ची आघाडी
- - - - -
सकाळी 10.15 वाजता
कोण आघाडीवर
सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे - नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे - भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी
संजय देशमुख - 22,025
विशाल पाटील-
उज्ज्वल निकम-
ओमराजे निंबाळकर
प्रतिभा धानोरकर - 19, 000 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते- मविआ - 8500
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव - शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी
कोण पिछाडीवर?
सुनेत्रा पवार
रामदार तडस
सुधीर मुनगंटीवार
अर्चना पाटील
----------------------------------------------------------
उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.
---------------------------------------------------------------------------------------
सर्वात मोठी बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर आहे. 6,300 मतांनी मोदी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत.
---------------------------------------------------------------------------------------
stay connected